धक्कादायक: हमारे लिए काम करो, बहुत पैसा मिलेगा, पाकिस्तानातून तरुणाच्या मोबाइलवर चॅटिंग

विवेक मेतकर
Wednesday, 26 August 2020

एका तरुणाच्या व्हॉट्सपवर बारा अंकी विदेशी क्रमांकावरून समोरील व्यक्तीने चॅटिंग केल्याचा प्रकार (ता. २३) रात्री घडला.
सदरील व्यक्ती पाकिस्तानमधून बोलत असल्याचे सांगून हमारे लिए काम करो, बहुत पैसा मिलेगा असा संवाद त्याने केला.

चिखली (जि.बुलडाणा) : तालुक्यातील पळसखेड जयंती येथील एका तरुणाच्या व्हॉट्सपवर बारा अंकी विदेशी क्रमांकावरून समोरील व्यक्तीने चॅटिंग केल्याचा प्रकार (ता. २३) रात्री घडला.
सदरील व्यक्ती पाकिस्तानमधून बोलत असल्याचे सांगून हमारे लिए काम करो, बहुत पैसा मिलेगा असा संवाद त्याने केला.

दरम्यान, युवकाने याबाबत चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून ही चॅटिंग पाकिस्तानातूनच झाली काय, याचा तपास सुरू केला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सोशल नेटवर्किंगच्या जगात अनोळखी माणसांशी संपर्कात येण्यात अनेकांना एक वेगळंच ‘थ्रील’ वाटतं. या आभासी जगातून आपल्या भावविश्वात स्थान मिळवणारी माणसं कोणत्या हेतूनं इथं दाखल झाली आहेत, याचा विचार होत नाही आणि त्यामुळेच पुढे अनेक अडचणी उभ्या राहतात.

चॅटिंगपासून सुरू होणारा प्रवास डेटिंगपर्यंत केव्हा पोहोचतो हे अनेकांच्या लक्षात येत नाही आणि परस्परांना समजून घेण्यापूर्वीच समोरच्या व्यक्तीचा खरा चेहरा अवास्तव अपेक्षांच्या रुपानं समोर येतो. अशावेळी नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच कितीही ‘थ्रिल‌िंग’ वाटलं, तरी या नात्यांना एक मर्यादा आखून ठेवा, असा सल्ला सायबर आणि मानसोपचारतज्ज्ञ देत आहेत.

नैराश्य नकोच
केवळ आपल्याशी चॅटिंगमध्ये चांगलं बोलणं करतेय; म्हणून समोरची व्यक्ती चांगलीच आहे, असा समज निर्माण होतो. अशावेळी त्या व्यक्तीच्या अपेक्षा आपल्याला माहिती नसतात. याचमुळे नंतर येणारं नैराश्य टाळण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी बोलतानाच त्याच्या आपल्याकडून नेमक्या अपेक्षा काय आहेत, हे जाणून घ्यायला हवे.

हेतू समजून घ्या
मानसोपचार तज्ज्ञांकडे आलेल्या नैराश्याच्या केसेसपैकी दहातील आठ व्यक्तींची फसवणूक ही वेगळे हेतू ठेवून केली जात असल्याचं समोर आलं आहे. मानसिक आधार देण्याचा बहाणा करून किंवा तुम्ही खूप छान आहात, असा विश्वास निर्माण करून डेटिंगमध्ये थेट जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं प्रमाण यात अधिक आहे. त्यामुळे समोरची व्यक्ती अचानकच आपल्याशी कोणत्या कारणांनी जवळीक वाढवतेय, त्याचे हेतू काय आहेत, हे आधीच समजून घेणे गरजेचे आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News Chatting on a young mans mobile from Pakistan