कौतुकास्पद: कृषी कन्यांनी बळीराजासाठी सुरू केले इन्फार्मेशन कॉर्नर!

संतोष थोरहाते
Saturday, 22 August 2020

भारत हा देश कृषि प्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातीत नागरीक शेती व शेतीशी संबंधी रोजगारावर अवलंबुन आहे. शेतक-यांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढवावे. शेतीच्या समृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे. पारंपरिक पद्धतीने पीक घेण्याच्या पद्धतीमुळे पिकाचे उत्पन्न कमी येते म्हणून शेतक-यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते.

हिवरा आश्रम (जि.बुलडाणा) :   शेतकरी बांधवांसाठी आधुनिक शेती संबधी माहिती व शेतीकरी यशोगाथा, शेती पुरक व्यवसाय माहिती, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बागायती शेती, पशू पालन, फळबाग लागवड या संबंधी शेतकऱ्यांना माहिती होण्याच्या दृष्टीने विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या विद्यार्थींनी अर्चना काकडे व निकिता पारवे या विद्यार्थिनींनी ग्रामपंचायत कार्यालयात नांद्रा कोळी येथे परिसरातील बळीराजासाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर सुरू केले आहे.

भारत हा देश कृषि प्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातीत नागरीक शेती व शेतीशी संबंधी रोजगारावर अवलंबुन आहे. शेतक-यांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढवावे. शेतीच्या समृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे. पारंपरिक पद्धतीने पीक घेण्याच्या पद्धतीमुळे पिकाचे उत्पन्न कमी येते म्हणून शेतक-यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

देशातील साक्षर पिढी शेती व्यवसायात उतरत आहे. त्यामुळे शेतीमध्ये विविध प्रयोग करून शेतीचे उत्पन्नात वाढ होत आहे. शेतीमध्ये झालेले संशोधन व शेतकऱ्यांनी अवलंब केलेले संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान या गोष्टींमुळे शेतीचा विकास होईल. यांत्रिकीकरणाच्या वापरामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होऊन कामाची गुणवत्ता सुधारते.

यामुळे पारंपारिक शेतीमध्ये बदल करून तुषार, ठिबक सिंचनाच्या साहयाने बागायती शेती करावी अशी माहिती यावेळी शेतकरी बांधवांना देण्यात आली. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्रा.मनोज खोडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

शेतकरी बांधवांसाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर अत्यंत महत्वपूर्ण आहे. शेतकरी बांधवांना या फलकाच्या माध्यमातून विविध उपयुक्त माहिती देण्याची व्यवस्था केली आहे.
-डॉ.सुभाष कालवे, प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय.

इन्फॉर्मेशन कॉर्नरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल. या फलकावरील माहिती नियमित अद्यावत करण्यात येणार आहे.
-अर्चना काकडे, विद्यार्थिनी, विवेकानंद कृषी महाविद्यालय.
(संपादन - विवेक मेतकर)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana news Information Corner for Krishi Kanyanche Baliraja