जिगाव प्रकल्पासाठी मिळणार चार हजार कोटी रुपये

Akola Buldana News Jigaon project will get Rs 4,000 crore
Akola Buldana News Jigaon project will get Rs 4,000 crore

नांदुरा (जि.बुलडाणा) : बळीराजा जलसिंचन योजने अंतर्गत व नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी अश्या जिगाव प्रकल्पाची आढावा बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे गुरुवारी (ता.६) पार पडली. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.


त्यावेळी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार.राजेश एकडे हे देखील या बैठकीत विशेष निमंत्रित म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.

 बैठकीत जिगाव प्रकल्प अंशतः पाणीसाठा करणेबाबत नियोजन १५ दिवसांत करावे, जिगाव प्रकल्पाचे उर्वरित किमतीमध्ये मुख्यता भूसंपादन व पुनर्वसनची किंमत असून, यासाठी साधारणता ४ हजार कोटी निधीची आवश्यकता आहे

याबाबत महामहीम राज्यपालांनी निधी वाटपाच्या सूत्रामध्ये बदल करून जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून येत्या दोन वर्षात चार हजार कोटी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री महोदय यांच्या सहीने राज्यपालानी निवेदन देण्याचे ठरले.

 पुनर्वसन गावठाण नागरी सुविधांची कामे करताना दर्जेदार व आदर्श पुनर्वसन करावे, या विषयावर चर्चा झाली. सदर बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री अतिशय सकारात्मक भूमिका दाखवल्यामुळे सदर प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

या बैठकीला लाभक्षेत्र विकासाचे सचिव संजय घाणेकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक जी.एम. शेख, जलसंपदा विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता अनिल बहादुरे, जलसंपदा विभागाचे सहसचिव अतुल कपोले, जलसंधारण विभागाचे उपसचिव धरणे, जिगाव प्रकल्प धरण विभाग शेगावचे कार्यकारी अभियंता सुनिल चौधरी, जिगाव उपसा सिंचन विभाग खामगावचे कार्यकारी अभियंता हजारे, परमजित सिंग जूनेजा, प्रामुख्याने उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com