खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

 अरुण जैन 
Friday, 24 July 2020

प्रकल्प 70% भरल्यामुळे दक्षतेचा भाग म्हणून हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याची आवक पाहून पुढील विसर्ग वाढविणे किंवा कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

बुलडाणा  : जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाची पाच वक्र द्वारे 20 सेंटीमीटर ने उघडले असून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे.

 सदर प्रकल्प 70% भरल्यामुळे दक्षतेचा भाग म्हणून हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याची आवक पाहून पुढील विसर्ग वाढविणे किंवा कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

 गेल्या दोन चार दिवसात झालेल्या समाधानकारक पावसाने खडकपूर्णा प्रकल्प 70 टक्के भरला आहे. मात्र जुलै महिन्यात 70 टक्क्यांपेक्षा त्याची पातळी अधिक होऊ नये व आगामी काळात अडचणी निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीपात्रात 3808 क्यूसेक  एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. तरी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News Khadakpurna project opens five doors