esakal | करवसुलीसोबत प्लास्टिकमुक्तीसाठी लोणार पालिकेची अनोखी शक्कल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Buldana News Lonar Municipality presents cloth bag to taxpayers

शहरातील मालमताधारकांकडे असलेली कराची रक्कम वसुली करण्याकरिता मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी अनोखी संकल्पना राबवली आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असलेल्या लोणार शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी १०० टक्के कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना कापडी पिशवी भेट आणि भविष्यात मोठे बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून देताच शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

करवसुलीसोबत प्लास्टिकमुक्तीसाठी लोणार पालिकेची अनोखी शक्कल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा


लोणार (जि.बुलडाणा)  :  शहरातील मालमताधारकांकडे असलेली कराची रक्कम वसुली करण्याकरिता मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी अनोखी संकल्पना राबवली आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असलेल्या लोणार शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी १०० टक्के कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना कापडी पिशवी भेट आणि भविष्यात मोठे बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून देताच शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.


ज्या नागरिकांनी आपल्याकडील मालमत्ता कर, पाणी कराची रक्कम भरली त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर नगराध्यक्ष पुनम मनीष पाटोळे, उपाध्यक्ष बादशहा शेठ आणि इतर नगरसेवकाच्या उपस्थितीत कापडी पिशवी भेट देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. पहिल्या तीन मालमत्ताधारकांचा कापडी पिशवी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

लोणार नगरपालिकेचा हा उपक्रम राज्यातील इतर नगरपालिका यांच्या करवसुलीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

लोणार नगरपालिकेची मालमत्ताकर आणि पाणी कराची रक्कम जवळपास चार कोटी रुपये प्रलंबित आहे. तिची वसुली करण्यासाठी आणि लोणार शहर हे प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी विठ्ठल केदारे नगरपालिका अध्यक्ष पूनम मनिष पाटोळे उपाध्यक्ष बादशहा सेठ आणि सर्व नगरसेवकांमध्ये चर्चा करून शहरातील जे मालमत्ताधारक त्यांच्याकडील मालमत्ता कर आणि पाणी कराची संपूर्ण रकमेचाभरणा करतील अश्या नागरिकांना कापडी पिशवी चे वाटप करण्यात येणार आहे. 

कापडी पिशवी तीन कप्प्याची असून, दहा किलो वजन क्षमतेची आहे. हिचा नागरिकांना नेहमी उपयोग होणार असून, २०२०-२१ च्या सुरुवातीला मागील वर्षभरात ज्या मालमत्ताधारकांनी नगरपालिकेकडे १०० टक्के पाणी कर आणि मालमत्ता कराची रक्कम भरणा केली त्यांना कापडी पिशवी दिली जात आहे.

अश्या नागरिकांसाठी लकी ड्रॉ सोडत काढून रंगीत टीव्ही, फ्रिज, ओव्हन आणि इतर सात बक्षिसे दिले जाणार आहेत. स्वातंत्र्य दिना निमित्ताने शहरातील ज्या मालमत्ताधारकाने आपल्याकडील कराची संपूर्ण रक्कम भर ली, अश्या प्रथम नागरिक वसीम खा शब्बीर खान, द्वितीय आत्माराम मारोती खोटे तृतीय शालिकराम राजाराम नेवरे यांचा नगराध्यक्ष पुनम मनिष पाटोळे उपाध्यक्ष बादशहा सेठ आणि इतर नगरसेवकांनी कापडी पिशवीची भेट देऊन सत्कार केला.
(संपादन - विवेक मेतकर)