मनसे जिल्हाध्यक्षांनी दिला दुय्यम उपनिबंधकाला चोप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांना खरेदी खत करण्यासाठी रजिस्टर कार्यलयात जावे लागते मात्र चिखली येथील दुय्यम उपनिबंधक अधिकारी कळसकर या अधिकार्याच्या जाचाला असंख्य शेतकरी वैतागले होते

बुलडाणा :जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांना खरेदी खत करण्यासाठी रजिस्टर कार्यलयात जावे लागते मात्र चिखली येथील दुय्यम उपनिबंधक अधिकारी कळसकर या अधिकार्याच्या जाचाला असंख्य शेतकरी वैतागले होते.

प्रत्येक शेतकर्यांकड़ून पैसे घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनीला होता.

त्याचा जाब विचारण्यास मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड़ यानी असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन कार्यलय गाठले व त्यानी जाब विचारला असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. तेव्हा मनसे जिल्हाध्यक्षांनी उपनिबंधक चांगलाच चोप दिला.
( संपादन - विवेक मेतकर) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola buldana news: mns fight against employee