रविकांत तुपकर झाले आक्रमक, म्हणाले बँकेत मुक्काम करण्याची वेळ येऊ देऊ नका

Akola Buldana News: Ravikant Tupkar became aggressive, said dont let the time come to stay in the bank
Akola Buldana News: Ravikant Tupkar became aggressive, said dont let the time come to stay in the bank

मोताळा, (जि.बुलडाणा) : खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ आली तरी अद्यापही बँकेने पीककर्जाचे वाटप केले नाही. शेतकऱ्यांची पीककर्जाची प्रकरणे मोठ्या संख्येन प्रलंबित आहे. सदर प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावून पीककर्ज वाटप करा, अन्यथा पीककर्जाची प्रकरणे निकाली निघेपर्यंत बँकेतून हटणार नाही. पीककर्जासाठी बँकेत मुक्काम करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.


शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी पाहता रविकांत तुपकर यांनी ता.१९ सप्टेंबर रोजी मोताळा स्टेट बँक शाखेत धडक दिली. त्यांनी मोताळा स्टेट बँके शाखेचे व्यवस्थापक सचिन कामठे यांची भेट घेवून जाब विचारला. सर्व प्रकरणे हे मान्यतेसाठी खामगावला जातात त्यामुळे विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे रविकांत तुपकर यांनी बँकेचे विभागीय अधिकारी वाघ यांच्याशी देखील याविषयावर चर्चा केली. तेव्हा येत्या आठ दिवसांमध्ये सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचे आश्वासन बँक प्रशासनाने दिले.

यावेळी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, दत्ता पाटील, विजय बोराडे, सतिष नवले, संतोष गवळी, शेख जाबिर, निलेश पुरभे, शेख आरिफ, निखील शिंबरे, भागवत धोरण, सैय्यद इमरान यांच्यासह ’स्वाभिमानी’चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com