बापरे! तीन युवकांचा नदीमध्ये बुडून मृत्यू ; दोन मृतदेह अजुनही बेपत्ता

गजानन काळुसे
Monday, 14 September 2020

सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ येथील विदुपा नदी वरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी केलेल्या तीन  युवकांचा बंधाऱ्यामध्ये पडुन मृत्यू झाला आहे

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) :  सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ येथील विदुपा नदी वरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी केलेल्या तीन  युवकांचा बंधाऱ्यामध्ये पडुन मृत्यू झाला आहे.

गंगाराम शांताराम भालेराव वय २८ वर्ष रा चांगेफळ या युवकांचा मृतदेह सापडला असून ज्ञानेश्वर धोंडीराम भालेराव वय २२ वर्ष रा.चांगेफळ व अविनाश सुरेश बांगर रा.कानडी ता.मंठा या दोघांचे मृत्यदेह सापडले नाही,बेपत्ता मृतदेहांचा शोध सुरू आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

१४ सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे ९ ते १० वाजेच्या सुमारास ५ युवक पोहण्यासाठी विदुपा नदी वरील बंधाऱ्यावर केले. तारीख १३ सप्टेंबर च्या रात्री बंधाऱ्याला पाऊस पडल्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी होते. पाण्या मध्ये पोहत असतांना युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही व पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे पाण्याच्या भोवऱ्यात एक युवक पाण्यामध्ये बुडत असल्यामुळे त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला,

परंतु त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असताना सोबतचे दोन युवक सुद्धा पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे व पाण्यामध्ये भोवरा असल्यामुळे बुडाले. सोबत असलेले दोन युवकांनी यांची माहिती स्थानिक नागरिकांना दिली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पोलीस विभागा व महसूल विभागाला माहिती दिली असून बेपत्ता युवकांचा शोध सुरू आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News: Three youths drown in river; Two bodies still missing