नदीच्या पुलावर साजरा केला खड्ड्यांचा वाढदिवस, शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

Akola Buldana river bridge celebrates birthday of potholes, Shiv Sangram activists set off firecrackers
Akola Buldana river bridge celebrates birthday of potholes, Shiv Sangram activists set off firecrackers

जऊळका  ः औरंगाबाद नागपूर सुपर हायवे रोडवरील जऊळका काटेपूर्णा नदीवरील पूल हा कित्येक वर्षांपासून ढासळत असून, मोठं मोठे खड्डे सुद्धा पडले आहेत. याच पुलावरून रोजची वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. वाहन घेऊन वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. नवीन पुलाचे बांधकाम व्हावे यासाठी वाशीम जिल्ह्यातील शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी पुलावर पडलेल्या खड्यांवर केक ठेऊन व फटाके फोडून वाढदिवस साजरा केला.

शासनाने आतातरी दखल घेऊन हा पूल बांधावा नाहीतर या पुढे आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गोळे, प्रदीप पाटील यांनी यावेळी दिला. पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कुठल्याही क्षणी त्याच्यावर दुर्घटना घडू शकते. प्रशासनचे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्रामने खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.

. यावेळी जऊळका पोलिस स्टेशनचे ठाणेदार बाळू जाधवर यांनी संपूर्ण पोलिस कर्मचाऱ्यांसोबत पुलावर चोख बंदोबस्त दिला. यावेळी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते प्रदीप कुटे, युवक जिल्हा अध्यक्ष स्वप्नील वाघ, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष विवेक देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राजेश कव्हर, जिल्हा प्रवक्ता अमोल नवघरे, जिल्हा संघटक माणिक गालाट, जिल्हा सरचिटणीस अनिल खानंझोडे, युवक तालुका अध्यक्ष भारत पोधाडे, जिल्हा संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर दंडाडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष शुभम शिंदे, विद्यार्थी सरचिटणीस अजय पांडे, तालुका उपाध्यक्ष सुधाकर धोंगडे, युवक तालुका अध्यक्ष राधेश्याम काकडे, जिल्हा सरचिटणीस अनिल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वानखेडे, विद्यार्थी सरचिटणीस शुभम नवघरे, जिल्हा कार्याध्यक्ष रविकुमार देवडे, रिसोड तालुका अध्यक्ष अशोक खडसे, शेख नदीम समीर बेग, अनिकेत गायकवाड, बिठ्ठल लहाने, धीरज चवधारी, रामा बिलावर, शेख अखिल, मारोती कोबीतो, गणेश जाधव, संतोष ठाकूर व शिवसंग्रामचे संपुर्ण पदाधिकारी, कार्यकते उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com