अकोला : केंद्रातील सरकार विश्वासघातकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : केंद्रातील सरकार विश्वासघातकी

अकोला : केंद्रातील सरकार विश्वासघातकी

अकोला : ई.पी.एस ९५ पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात धरणे देण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक गोपाल मांडेकर यांनी केले. यावेळी राजेंद्र भातुलकर महाबीज सेवानिवृत्त संघटना यांनी मोलाचे मार्गदर्शन पेन्शनरांना केले. व्ही.एम.पतंगराव, रमेश गायकवाड यांनी सुध्दा यासभेत आपले पेन्शनरांबद्दलचे मत व्यक्त करून केंद्र सरकारकडून पेन्शन वाढ घेतल्याशिवाय हा लढा मागे घेणार नाही, असा इशारा दिला.

अध्यक्षीय भाषणात देवराव पाटील यांनी आपल्या ओझरत्या भाषणातून केंद्र सरकारवर कडाडून हल्ला करताना सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यांनी निवडणुकी आधी आमचे सरकार सत्तेवर आल्यास ९० दिवसात तीन हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता ही मागणी पूर्ण करेल, असे आश्वासन दिले होते. परंतु गेले सात वर्षात एक पैशाचा सुध्दा लाभ पेन्शनरांना या सरकारने दिला नाही. आमच्याकडे पेन्शनरांकरिता फंड उपलब्ध नाही. यांना पुतळे बांधणे, मंदीर बांधणे, नद्या साफ करणे व स्वत:करीता विमाने खरेदी करणे यावर वारेमाप खर्च करण्याकरिता पैसा आहे. परंतु देशाला महासत्ता बनविणाऱ्या कष्टकरी कामगारांना त्यांचे न्याईक हक्क देण्यास पैसा नाही. ही कीती अमानवीय बाब आहे. म्हणून कामगार कर्मचाऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना केंद्रातील सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून येत्या काळात त्यांची सत्ता हिसाकावने हेच कार्य पेन्शनरांनी केले पाहिजे. कारण या सरकारने १९४० साली इंग्रज सरकारने प्रदान केलेले कामगारांचे हक्क काढून घेण्याचे महापाप या सरकारने केले आहे. त्यामुळे यापुढे कामगार वर्ग फक्त कंत्राटी कामगार म्हणून राहील. त्यांना ग्रॅच्युईटी, पेन्शन, बोनस मिळणार नाही. हक्कासाठी संप करण्याचा अधिकार सुध्दा या सरकारने काढनू घेतला आहे. म्हणून या सरकारला पदच्युत करणे ही आपली जबाबदारी व कतर्व्य आहे. येत्या ता. २० नोव्हेंबर २०२१ ला होणाऱ्या सीबीटीच्या मिटींगमध्ये कोशीयारी समिती मान्य झाली नाही तर कार्यरत कर्मचारी व पेन्शनर यांचा सयुंक्त लढा उभारून आमचे हक्क आम्ही पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा देवराव पाटील यांनी दिला.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

या धरणे आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्याकरिता उपायुक्त बोरकर यांनी पेन्शनरांच्या धरणे आंदोलन स्थळी येवून पेन्शनरांच्या मागण्यांचे निवेदनाचा स्वीकार केला. या धरणे आंदोलनात उमरखेड, बुलडाणा, अकोला, वाशीम येथील बहुसंख्य पेन्शनर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रकांत अवचार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता वसंत सिंहे, निवाने, काटे, पंत, दही, सरोदे, चोरे, सुखदिवे यांनी परीश्रम घेवून हा कार्यक्रम यशसवी केला.

loading image
go to top