
राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!
मुंबई : राज्यातील ग्रामपंचातीच्या सदस्यांपैकी काही जागा सदस्याचे निधन,राजीनामा,सदस्यत्व रद्द अथवा इतर अन्य कारणामुळे रिक्त जागा झाल्या असतील.अशा ग्रामपंचातीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून.याबाबतचा पत्रव्यवहार राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना आयोगाने केला आहे. या निवडणुका पारंपरिक पद्धतीने पार पाडल्या जाव्यात असे आयोगाने सुचवले असून कोरोना साथीच्या संसर्गाचा विचार करून आयोगाने काही सूचना देखील केल्या आहेत.
राज्यातील 34 जिल्ह्यातील 4554 ग्रामंपचांतीमध्ये पोटनिवडणुकिचा कार्यक्रम पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यानुसार या सर्व ग्रामपंचायतीच्या एकूण 7130 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
हा कार्यक्रम जाहीर करताना आयोगने काही सूचना केल्या आहेत.त्यामध्ये ज्या ग्रामपंचायत हद्दीत अँक्टीव कोविड रूग्णसंख्या नगण्य आहे. ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपण्यास सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यापुर्वी त्या ग्रामपंचायतीचे एकूण आरक्षण 50 टक्क्याच्या मर्यादेत ठेवणे. नागरिकाच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्यापर्यत ठेवणे.आरक्षण मर्यादेची अंमलबजावणी करताना ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येची गणणा विचारात घ्यावी.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेल्या रिक्त जागांचे सर्व साधारण जागत बदल करण्यासाठी अंतिम प्रभाग रचनेसाठी सुधारणा अधिसूचना करण्याची तारीख---22/11/2021 पर्यत
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस कालावधी व दिनांक---22/11/2021
नामनिर्देशन पत्रे मागवण्याचा व सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ---30/11/2021 ते06/12/2021
( वेळ 11 ते दु.3 वाजेपर्यंत )
नामनिर्देशनपत्र छाननी करण्याची वेळ--07/22/2021( 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यत)
नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची तारीख---09/12/2021(दु.3 वाजेपर्यंत )
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध कराणे---09/12/2021(दु.3वाजेपर्यत)
आवश्यक असल्यास मतदानाची तारीख---21/12/2021(सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 )
मतमोजणी तारीखा---22/12/2021
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना काढण्याची तारीख---27/12/2021