Akola City Bus: १ ऑक्टोबरला सिटी बससेवेचा श्रीगणेशा; अकोल्याच्या रस्त्यांवर धावणार ई-बसेस; आठ मार्ग निश्चित

Akola City Bus Service Set to Begin From October 1: अकोला शहरातील बहुप्रतीक्षित सिटी बससेवा १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. पीएम ई-बस योजनेतून ४२ ई-बसेसना मंजुरी असून आठ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
Akola City Bus

Akola City Bus

esakal

Updated on

अकोला: शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला सिटी बसचा प्रश्न मार्गी लागला आहे. महापालिकेच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या ई-बस सेवेसाठी शहरातील आठ प्रमुख मार्ग निश्चित करण्यात आले असून, अकोल्यासाठी पीएम ई-बस योजनेतून ४२ बसेस मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ४२ बसेस उपलब्ध होणार असल्याने शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही सार्वजनिक वाहतुकीची सुविधा मिळणार आहे. महापालिकेच्या वर्धापनदिनी, १ आॅक्टोबरपासून ही सेवा सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com