Akola : आता मिळणार यंत्राद्वारे पाच रुपयात कापडी पिशवी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटाच्या महिलांनी बनवलेली कापडी पिशवी

Akola : आता मिळणार यंत्राद्वारे पाच रुपयात कापडी पिशवी!

अकोला : श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थी रोहन बुंदेले यांनी तयार केले कापडी व कागदी पिशवी स्वयंचलित यंत्र अवघ्या पाच रुपयात कापडी पिशवी देणार आहे. त्यांच्या या पर्यावरण पूरक व रोजगार निर्मिती प्रतिकृतीची राज्यस्तीय आविस्कारसाठी निवड झाली आहे.

प्लास्टिक पिशव्यांमुळे महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा दशलक्ष एवढा कचरा निघतो. त्याचे दुष्परिणाम मानव, प्राणी, पशु-पक्षी, हवा, पाणी, मृदा इत्यादीवर दिसून येते. त्याकरिता पर्यायी वस्तू अत्यंत सोपी व सुलभ पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून प्लास्टिक प्रदूषण कमी करणारे यंत्र श्री शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहन बुंदेले याने तयार केले आहे. या प्रकल्पातून तयार केलेले वेंडिंग मशीन अकोला शहरांमध्ये लोकांना सहज आणि कमी दरामध्ये कापडी व कागदी पिशवी उपलब्ध करून देत आहे.

जेणेकरून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी होऊ शकेल. याशिवाय यातून रोजगार निर्मितीही होत आहे. अशा या महत्वाकांक्षी प्रकल्पाची निवड राज्य स्तरावर करण्यात आली आहे. श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थी रोहन बुंदेले यांनी तयार केलेल्या या प्रकल्पासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, डॉ. अंजली कावरे, डॉ. प्राजक्ता पोहरे यांचे मार्गदर्शन लाभले.

रोहन बुंदेले यांनी तयार केलेला पर्यावरण पूरक प्रकल्प अतिशय महत्‍वाकांक्षी आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरण रक्षण व रोजगार यावर भर दिला आहे. हा प्रकल्प जिल्हास्तरावर राबविण्यात येईल.

- प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला