

Fire brigade in action at Akola’s old cloth market after a massive blaze gutted a showroom, causing heavy losses.
Sakal
अकोला: शहरातील गजबजलेल्या जुन्या कापड बाजारात गुरुवारी (ता.६) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. जे.जे. कपड्यांचे शोरूममध्ये ही आग लागली असून या घटनेत लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.