Akola news : संतुलित जीवन जगण्याची गुरुकिल्ली म्हणजे आयुर्वेद

‘कॉफी विथ सकाळ’ मध्ये तज्ज्ञांचा सूर
coffee with sakal ayurveda doctor
coffee with sakal ayurveda doctorsaklal
Updated on

अकोला : आयुर्वेद ही केवळ एक उपचार पद्धती नाही, तर जीवन पद्धती आहे. त्यामुळे जीवन जगत असताना आयुर्वेद, योग, प्राणायाम याचा दैनंदिन जीवनात उपयोग केल्यास प्रत्येक व्यक्तीला निरोगी व संतुलित जीवन जगता येते, असे मत ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी व्यक्त केले.

आयुर्वेद जगण्याचा एक मार्ग आहे. आपले शरीर पूर्णपणे निरोगी रहावे, यासाठी आपल्याला चांगला आहार, योग, डिटॉक्सिफिकेशन, ध्यान आणि उत्तम जीवनशैली इत्यादींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आयुर्वेद लोकांचे जीवन निरोगी आणि संतुलित बनविण्यात मदत करते. आयुर्वेद ही संकल्पना शरीर शुद्धीकरणाच्या कल्पनेवर आधारित आहे.

आयुर्वेद सर्व आरोग्य समस्यांना बरे करण्यास सक्षम आहे. आयुर्वेद व योगाने मानसिक आरोग्यसह शारिरीक आरोग्य सुधारते. चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात. त्यामुळे आयुर्वेदाकडे सर्वांनी एक उपचार पद्धती म्हणून नव्हे तर जीवन पद्धती म्हणून बघावे, असे मत शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी व्यक्त केले.

आयुर्वेदासंर्भात नागरिकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. सध्या समाज माध्यमांवर व यू-ट्यूबवर कोणीही व्हिडीओ अपलोड करतो स्वतःला आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून सांगतो. परंतु यू-ट्यूबवरील उपचार बघून आयुर्वेदीक उपचार करणे चुकीचे आहे. आयुर्वेदात बऱ्याच आजारांचे उपचार होऊ शकत नाही, असा नागरिकांचा समज आहे.

सध्या चुकीच्या उपचार पद्धतीने सध्या किडनी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु आयुर्वेदीक उपचार घेतल्याने अनेक किडनीचे रोगी बरे झाले आहेत, तर कॅन्सर ग्रस्तांचे आयुष्य सुद्धा वाढले आहे. आयुर्वेदात सर्वच रोगांवर उपचार होऊ शकतो.

- डॉ. सचिन (नाना) म्हैसने

coffee with sakal ayurveda doctor
Akola News : कामात हलगर्जी सहन केली जाणार नाही

सम धातू, समाग्नी, सम मलक्रिया, प्रसन्न आत्मा, इंद्रिय, मन यालाच आयुर्वेदामध्ये संपूर्ण आरोग्य म्हणतात. आयुर्वेदात अवस्था महत्वाची आहे. अग्नीकर्माद्वारे एखाद्या शारिरीक त्रासापासून रोग्याला लवकरच मुक्ती देता येऊ शकते.

त्यासोबतच इतर क्रिया व औषधोपचाराने रोगी बरा होऊ शकतो. नित्य प्राणायाम, योगा केल्यास त्याचा निरोगी राहण्यासाठी फायदा होतो. शास्त्रांमध्ये आयुर्वेदा सोबत आध्यात्माची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे रोग्याचा शारिरीक व मानसिक आजार बरा करण्यासंदर्भात मदत होते.

- डॉ. तुषार गावंडे

आयुर्वेदात तापीपासून कॅन्सरपर्यंत सर्वच आजारांवर औषधोपचार उपलब्ध आहे. आयुर्वेदाने हळू-हळू रोग बरा होतो असा चुकीचा समज आहे. परंतु आयुर्वेदाने लिव्हर ट्रान्सप्लांट टळू शकते. आयुर्वेदामुळे दहा लोकांपैकी सात जणांचे असाध्य आजार बरे होऊ शकतात. आयुर्वेदात इतर चिकित्सा पद्धती प्रमाणे वारेमाप खर्च करण्याची वेळ येत नाही. त्यासोबतच तपासण्यांसाठी खर्च करावा लागत नाही. योग ही एक जीवन पद्धती असून त्याला आयुर्वेदाची जोड दिल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.

- डॉ. राजेश भोंडे, कोषाध्यक्ष, अकोला आयुर्वेद प्रॅक्टिक्शनर असो.

coffee with sakal ayurveda doctor
Akola News : सराफा-पोलिस संघर्षावर स्वर्ण दक्षता समितीचा तोडगा

यूट्‍युब व इतर समाजमाध्यांमुळे आयुर्वेदासंदर्भात बराच अपप्रचार सुरू आहे. कोणाताही व्यक्ती लहान मोठी जडीबुटी व औषध देऊन स्वतःला आयुर्वेदाचार्य किंवा डॉक्टर समजतो. परंतु महाराष्ट्र काउंसिल ऑफ इंडियन मेडिसीनचे रजिस्ट्रेशन असलेले डॉक्टरच अधिकृत समजावे. आयुर्वेद हे एक शास्त्र आहे.

आयुर्वेदात थेट रोगाच्या मुळावर उपचार करण्यात येतो. त्यामुळे आयुर्वेदात पथ्य हे आजाराचे असतात, आयुर्वेदाने सध्या मोठ्‍या प्रमाणात प्रगती केली असून विविध नवीन उपचारपद्धतींचा अवलंब सुद्धा करण्यात येतो. त्यामुळे आजार सुद्धा दोन-तीन दिवसांच्या औषधोपचाराने बरा होतो. जगातील पहिली सर्जरी ही आयुर्वेदात झाली असल्याची नोंद शास्त्रात आहे.

- डॉ. नितीन धनोकार, अध्यक्ष, अकोला आयुर्वेद प्रॅक्टिक्शनर असो.

आयुर्वेद हे रोग दूर करण्यासह निरोगी जगण्याचे साधण आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आयुर्वेदातून उपचार घेतल्यास त्याचा रोग बरा होऊ शकतो. घरातील मसाल्यांमध्ये सुद्धा आयुर्वेदाचे गुणधर्म आहेत. शमन चिकित्सा,

औषधी पंचकर्म व उपचार पद्धतीद्वारे एकाद्या व्यक्तीवर उपचार केल्यास त्याचा रोग तर बरा होतोच त्यासोबतच व्यक्तीमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आयुर्वेदात अर्धशक्ती व्यायामला महत्व आहे. सहजरित्या घेता येणाऱ्या औषधी देखील आता आयुर्वेदात आहेत.

- डॉ. योगेश बदरखे

सध्या नागरिकांमध्ये हर्बल व आयुर्वेदासंदर्भात गैरसमज आहेत. परंतु हर्बल म्हणजे आयुर्वेद नव्हे. आयुर्वेदाचे आठ अंग आहेत. म्हणून त्याला अष्टांग आयुर्वेद म्हणतात. आयुर्वेद हे सिद्धांतावर अवलंबून आहे. या उपचार पद्धतीने रोग्याचे नुकसान होत नाही.

त्यासोबतच कमी खर्चात सर्वच रोगावर उपचार होऊ शकतात. लोकांमध्ये आयुर्वेदासंदर्भात अधिक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक सरकारी रुग्णालयात आयुष ओपीडी सुरु करावी, त्यासोबत आयुर्वेदाच्या प्रचार प्रसारावर शासनाने जोर द्यावा.

- डॉ. स्वप्निल गावंडे, सचिव, अकोला आयुर्वेद प्रॅक्टिक्शनर असो.

coffee with sakal ayurveda doctor
Akola News : सराफा-पोलिस संघर्षावर स्वर्ण दक्षता समितीचा तोडगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com