esakal | आठवडाभर मूर्तिजापूर शहराच्या सीमा बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Corona News Murtijapur city limits closed for a week

कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मूर्तिजापूर शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाले असून, प्रशासनाने शहराच्या सरहद्दी आठवडाभरासाठी बंद केल्या आहेत.

आठवडाभर मूर्तिजापूर शहराच्या सीमा बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मूर्तिजापूर शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाले असून, प्रशासनाने शहराच्या सरहद्दी आठवडाभरासाठी बंद केल्या आहेत.


मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले असून, उद्या (ता.२३) सकाळी ६ वाजतापासून सोमवारी (ता.१) सकाळी ८ वाजेपर्यंत लॉडकाउन जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषध दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, दवाखाने या सात दिवसांच्या कालावधीत दररोज सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील, असे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी कळविले आहे.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

पुढील सात दिवस शहर बंदीस्त करून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, शहरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. रेस्ट हाऊस जवळ अकोला नाका, चिखली गेट, भटोरी नाका, रेल्वे उड्डान पूल, देवरण फाटा, आसरा रोड, दर्यापूर-कारंजा रस्त्यावरील नाका, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हिंदू स्मशानभूमी, या ठिकाणी बॕरिकेडस् लावण्यात येत असून प्रवेश बंद करण्यात येत आहे. शहरांतर्गत काही पॉईंट निश्चित करून पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.

हेही वाचा - हॉटेल बंद, पार्सल सुविधाच मिळणार, लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी

देऊळबंद!
कोरोनाची दुसरी लाट व अकोला जिल्ह्यासोबतच, इतरही जिल्हे तथा प्रामुख्याने मूर्तिजापुरात बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने श्री पुंडलीक महाराज मंदिर ता. २२ फेब्रुवारीपासून दर्शनासाठी बंद करण्यात येत आहे. विदर्भातील पुंडलिक भक्तांनी सहकार्य करा, असे आवाहन संस्थानचे व्यवस्थापक विवेक पातोंड यांनी केले आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!