esakal | शासकीय कार्यालयांच्या दिव्याखालीच अंधार; फिजिकल डिस्टंन्सिंगचा कर्मचाऱ्यांकडूनच फज्जा!
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola Corona News Physical distance fuss in Collectorate and Zilla Parishad

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अकाेला महापािलका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यानंतर शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र दिव्याखाली अंधार म्हणावे त्या प्रमाणे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अत्यावश्यक सेवा देणारे विभाग सोडून इतर विभागातच गर्दी दिसून येत आहे.

शासकीय कार्यालयांच्या दिव्याखालीच अंधार; फिजिकल डिस्टंन्सिंगचा कर्मचाऱ्यांकडूनच फज्जा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकाेला : काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अकाेला महापािलका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यानंतर शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र दिव्याखाली अंधार म्हणावे त्या प्रमाणे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अत्यावश्यक सेवा देणारे विभाग सोडून इतर विभागातच गर्दी दिसून येत आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अकाेला, मूर्तिजापूर व अकाेट शहर ही क्षेत्रे प्रतिबंधित म्हणून जाहीर केली आहे. या ठिकाणी काेराेना विषाणू प्रतिबंधक उपाय याेजनांची अंमलजावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र साेमवारी सरकारी कार्यालयातच उपाय याेजनांना ठेंगा दाखविण्याचे काम कर्मचारी, अधिकारी व कंत्राटदारांकडून होताना दिसून आले.

हेही वाचा - हॉटेल बंद, पार्सल सुविधाच मिळणार, लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी

आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे ३७ दवसच शिल्लक राहिल्याने कामं पूर्ण करणे, देयक अदा करणे आदींसह अन्य कामांसाठी विविध विभागात गर्दी वाढली आहे. या गर्दीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचेही भान अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत कंत्राटदारांना राहिले नाही.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

जिल्हाधिकारी कार्यालयातील नाेंदणी कार्यालयात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कंत्राटदारांची गर्दी होती. महानगरपालिका कार्यालयात नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून आले.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!

loading image