esakal | चिताजनक:  ११५७ तापसण्या, २८८ पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

akola corona test positive news in marathi

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख वाढतच असून, रविवारीसुद्धा ११५७ प्राप्त अहवालातून २८८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकाचा मृत्यू झाला. ८९ जणांची प्रकृती चांगली झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

चिताजनक:  ११५७ तापसण्या, २८८ पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख वाढतच असून, रविवारीसुद्धा ११५७ प्राप्त अहवालातून २८८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकाचा मृत्यू झाला. ८९ जणांची प्रकृती चांगली झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.


रविवारी सकाळी २२२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यात ८४ महिला व १३८ पुरुषांचा समावेश होता. त्यातील सर्वाधिक ४९ रुग्ण अकोट येथील होते. सायंकाळी ६६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २२ महिला व ४४ पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी दुपारनंतर एकाचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Breaking : पुन्हा निर्बंध; मंगळवारपासून पूर्ण लॉकडाऊन

हा व्यक्ती मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे. या ८८ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ता. १० रोजी दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १६, आयकॉन हॉस्पिटल येथून सात, ओझोन हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून चार, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून आठ, अवघाते हॉस्पिटल येथून सहा, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून १०, तर होम आयसोलेशन येथून ३२ असे एकूण ८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या जिल्ह्यातील १९९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

0 घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!