कडक शिस्तीचा आज शेवटचा दिवस, रस्ते ओस; दुकानांना टाळे

सुगत खाडे  
Monday, 20 July 2020

कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. 19) शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. नागरिकही घराबाहेर पडले नाही. त्यामुळे टाळेबंदीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा रस्त्यांवर शुकशुकाटच दिसून आला.

अकोला,  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. 19) शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. नागरिकही घराबाहेर पडले नाही. त्यामुळे टाळेबंदीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा रस्त्यांवर शुकशुकाटच दिसून आला.

कोरोना विषाणू विरोधात लढाईला अधिक तीव्र करण्यासाठी जिल्ह्यात 18, 19 व 20 जुलैरोजी तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन (टाळेबंदी) जाहीर करण्यात आला आहे. 'टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता. 18) अकोलेकरांनी पुन्हा एकदा शिस्तीचा परिचय दिला. रविवारी सुद्धा सकाळपासूनच रस्त्यावर शुकशुकाट होता. कुणीही घराबाहेर पडले नाही. फक्त अत्यावश्‍यक सेवा सुरळीत होत्या. दवाखाने, औषध विक्रीची दुकाने, दुध डेअरीची दुकाने उघडी होती. हॉटेल, कपडा, किराणा व इतर व्यावसायिकांनीही लॉकडाउनमध्ये सहभागी झाल्याने दुसऱ्या दिवशी सुद्धा कडकोड बंद पाहायला मिळाला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

रस्ते सामसूम; पोलिस ड्युटीवर
लॉकडाउनच्या दुसऱ्या दिवशी शहरातील बहुतांश रस्ते निर्मनुष्य होते. परंतु चौकात काही ठिकाणी पोलिसांची हजेरी दिसून आली. वाहतूक पोलिसांनी घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर सुद्धा पोलिसांनी दंडाचा बडगा उगारला.

शिस्तीचा आज शेवटचा दिवस
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपायांचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, लहान-मोठे व्यवसाय शनिवार (ता. 18) ते सोमवार (ता. 20) पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे सोमवारी (ता. 20) सुद्धा जिल्ह्यात लॉकडाउन कायम राहिल. त्यामुळे नागरिकांना आणखी एक दिवस शिस्त पाळावी लागेल.

 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola corona Today is the last day of strict discipline, roads dew; Avoid shops