esakal | कोरोना बळींमध्ये तरुणांचाही समावेश,  तरुणांनो आता तुम्हीच घ्या काळजी 
sakal

बोलून बातमी शोधा

akola Corona victims include young people, young people, take care now

कोरोनाचा संसर्ग वयोवृद्ध व लहान मुलांनाच अधिक होण्याची भीती व्यक्त होत असताना अकोला शहरात मात्र हा समज खोडून निघाला आहे. शहरात आतापर्यंत आढळलेल्या दीड हजार रुग्णांपैकी पावणेआठशे, म्हणजे टक्‍क्‍यांच्या आसपास रुग्ण ते वयोगटांतील असल्याची चिंताजनक स्थिती असतानाच आता कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांमध्ये तरुणांचा समावेश वाढला आहे. कारण, शनिवारी झालेल्या चार मृत्यूपैंकी दोन जण तरुण असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये एक 24 वर्षीय महिला तर दुसरा 36 वर्षीय पुरुष आहे. 

कोरोना बळींमध्ये तरुणांचाही समावेश,  तरुणांनो आता तुम्हीच घ्या काळजी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः कोरोनाचा संसर्ग वयोवृद्ध व लहान मुलांनाच अधिक होण्याची भीती व्यक्त होत असताना अकोला शहरात मात्र हा समज खोडून निघाला आहे. शहरात आतापर्यंत आढळलेल्या दीड हजार रुग्णांपैकी पावणेआठशे, म्हणजे टक्‍क्‍यांच्या आसपास रुग्ण ते वयोगटांतील असल्याची चिंताजनक स्थिती असतानाच आता कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांमध्ये तरुणांचा समावेश वाढला आहे. कारण, शनिवारी झालेल्या चार मृत्यूपैंकी दोन जण तरुण असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये एक 24 वर्षीय महिला तर दुसरा 36 वर्षीय पुरुष आहे. 


शनिवारी सकाळी तीन जणांचा मृत्यू झाला होता. तिघेही पुरुष होते. त्यातील एक जण बाळापूर येथील 36 वर्षीय व्यक्ती आहे. हा व्यक्ती 23 जून रोजी दाखल झाला होता. तर सायंकाळी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. ही 24 वर्षीय महिला रुग्ण महान बार्शीटाकळी येथील रहिवासी आहे. ही रुग्ण 30 जून रोजी दाखल झाली होती. तिचा आज दुपारी उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. तर अन्य एक 72 वर्षीय व्यक्ती अकोट येथील असून, हा व्यक्ती 2 जुलै रोजी दाखल झाला होता. तर अन्य आणखी एक 72 वर्षीय व्यक्ती खैर मोहम्मद प्लॉट येथील असून हा व्यक्ती 29 जून रोजी दाखल झाला होता. असे असताना अकोल्यात आतापर्यंत 89 मृत्यू झाले असून, यातील सर्वाधिक मृत्यू हे ते वर्षे वयोगटातील आहेत. त्यामध्ये सर्वाधित मृत्यू हे वर्षे वयोगटातील नागरिकांचे झाल्याचे दिसते. असे जरी असले तरी शनिवारी आलेल्या मृत्यूच्या अहवालात मात्र, दोन तरुणांचा समावेश असल्याने आता तरूणांनीही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आजार अंगावर काढू नका 
शनिवारी झालेल्या चार मृत्यूपैंकी 2 जण तरुण होते. याबाबत सर्वोपचार रुग्णालयाला विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्या तरुणांचा मृत्यू झाला ते अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हा तरुणांनीही आजार अंगावर काढू नये, वेळेवर उपचार घ्यावे, डॉक्‍टरांना भेटावे असे आवाहन सर्वोपचार रुग्णायकडून करण्यात आले आहे. 

ज्येष्ठांनी हे करावे 
- घरातून बाहेर पडू नये. बाहेरच्या व्यक्तींना बेफिकीरीने घरात येऊ नये. 
- कामासाठी कोणाला भेटतान त्याच्यापासून एक मीटर अंतर ठेवा. 
- जीवनावश्‍यक खरेदीसाठी घरातील इतरांना बाहेर जाऊ द्या, शेजाऱ्यांची मदत घ्या. 
- घरात केवळ बसून किंवा पडून राहू नका, थोड्या-थोड्या वेळाने चालत राहा. 
- सोम्य व्यायाम व योगासने करा, वैयक्तिक स्वच्छता पाळा. 
- रोजच्या जेवणात घरी बनवलेले ताजे अन्न घ्या, भरपूर पाणी प्या.  

loading image