अकोला : मनपाच्या उत्पन्नात ‘लिकेज’ भारी!

विरोधी पक्षांनी ठेवले भ्रष्टाचारावर बोट; उत्पन्न वाढीच्या सूचनांसह महासभेत अंदाजपत्रक मंजूर
Akola Municipal Corporation
Akola Municipal Corporationsakal

अकोला : महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसोबतच होणाऱ्या खर्चातील ‘लिकेज’ शोधून भ्रष्टाचाराला आळा घातल्यास बराचशा निधी शिल्लक राहून तो विकासावर खर्च करता येईल, या विरोधी पक्ष सदस्यांच्या सूचनेसह उत्पन्न वाढीच्या इतर सूचनांवर चर्चा करीत शुक्रवारी मनपाच्या विशेष सभेत १२४६ कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.स्थायी समिती सभापती संजय बडोणे यांनी सकाळी ११.३० वाजता महासभेत स्थायी समितीने मंजूर केलेले अंदाजपत्रक महापौर अर्चना जयंत मसने यांच्याकडे सोपविले.

ऑनलाईन सभेला आयुक्त कविता द्विवेदी, उपमहापौर राजेंद्र गिरी व नगरसचिव अमोल डोईफोडे आदींची उपस्थित होती. त्यानंतर झालेल्या चर्चेत विरोध पक्ष सदस्यांनी मनपाच्या उत्पन्न वाढीत मोठा अडसर भ्रष्टाचार असल्याबाबत चिंता व्यक्त केली. त्याला सत्ताधारी भाजपच्या स्वीकृत सदस्यांनी होकार भरला. निवडणुकीच्या तोंडावर सादर होत असलेल्या अंदाजपत्राक कोणत्याही नाविण्य पूर्ण योजनेचा समावेश करण्यात आला नसला तरी कर वाढी रुपी कोणताही भार सर्व सामान्यांवर टाकण्यात आला नसल्याचे अंदाजपत्रकातून दिसून आले. एकूण १२४८ कोटी रुपयांचे शिलकीच्या अंदाजपत्रकाला अवघ्या ४५ मिनिटांच्या चर्चेनंतर सर्व पक्षांनी मंजुरी दिली.

मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी सदस्यांनी सूचविलेले उपाय लक्षात घेवून अंदाजपत्रक मंजूर केले आहे. अंदाजपत्रकात शहराच्या विकासाचा सर्वांगिण विकास करण्यासोबतच सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडणार नाही, याचाही विचार केला आहे.

- महापौर अर्चना मसने

मनपा निधीतून कोणताही विकास होत नाही. आर्थिक तरतुद केल्यानंतरही त्यासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याचे आतापर्यंतचे चित्र होते. यावेळी आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केले आहे. सर्वकाही नियोजनाप्रमाणे झाल्यास आतापर्यंत होत असलेल्या तक्रारी पुढील वर्षी करण्यासाठी जागा राहणार नाही.

- आयुक्त कविता द्विवेदी

मनपाच्या अंदाजपत्रकात उत्पन्न वाढीसाठी जसा भर दिला जातो, तसाच तो आर्थिक लिकेजस दूर करण्यावरही दिला जावा. शौचालयाचा २७ कोटी भ्रष्टाचार, अमृत योजनेतील कंत्राटदाराला दिलाला नियमबाह्य लाभ अशा प्रकारचे लिकेजस थांबविण्यात यावे. आवकवर जसे लक्ष दिले जाते, तसेच जावकवरही लक्ष देणे आवश्यक आहे.

- डॉ. झिशान हुसेन, मनपा विरोधी पक्ष नेते (काँग्रेस)

कोण काय म्हणाले ?

माजी महापौर विजय अग्रवाल ः उत्पन्न वाढीसोबत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी निधी मंजूर करून आणावा. अंदाजपत्र सर्वांच्या हिताचे आहे.

सिद्धार्थ शर्मा (भाजप)- अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या कामाचा दर्जा योग्य नव्हता. त्यात आणखी तांत्रिक सल्लागार नियुक्तीवर होणार खर्च अधिक वाटतो. शहरातील चौकांच्या सौंदर्यिकरणासाठीचा निधी वाढवून देण्यात यावा उत्पन्नाचे ‘टार्गेट’ कसे पूर्ण होईल याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

सतिष ढगे (भाजप) - मनपाच्या मुख्य प्रवेश द्वारावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी निधीची तरतूद करावी.

किरण बोराखडे (वंचित)- शौचालय दुरुस्तीसाठी दरवर्षी अंदाजपत्रकार मोठा निधी प्रस्तावित असतो. प्रत्यक्षात शौचालयांच्या दुरुस्ती व देखभालीवर खर्च होताना दिसत नाही.

पराग कांबळे (काँग्रेस) - जनता बाजाराच्या बीओटीवरील विकासाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. याशिवया महसूल मंत्र्यांचा स्थगनादेशही आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात त्याचा उल्लेक करणे योग्य नाही.

पेंटर रहिम (राष्ट्रवादी काँग्रेस) - पंधरावा वित्त आयोगासाठी निधी उपलब्ध करून घेणे व अल्पसंख्यांक निधीची पुरेशी तरदूत करण्यात यावी.

पुतळ्यांचा खर्च नको!

महानगरपालिका परिसरात महामानवांचे पुतळे बसवून परिसर पुतळामय करू नये. महामानवांचा योग्य तो सन्मान राखण्यासाठी मनपा सर्वच प्रकार प्रयत्न करीत असते. आज एक पुतळा बसविला तर उद्या प्रत्येक जण पुतळा बसविण्याची मागणी करेल. त्यामुळे पुतळ्यांवरील खर्च नको, अशी सूचना भाजपचे सिद्धार्थ शर्मा यांनी मांडली. त्यापूर्वी भाजपचेच सतिष ढगे यांनी प्रवेश द्वारावर शिवाजी महाराजांचा पुतळा तर परिसरात अलिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविण्याची सूचना माजी महापौर सुमनताई गावंडे यांनी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com