अकोला : कपाशी मजुराअभावी होत आहे मातीमोल!; शेतकरी हवालदिल

सलगच्या पावसामुळे कापसाच्या बोंडाना कोब फुटत
 ‘मर’ रोग आल्यामुळे कपाशी अशी वाळत आहे.
‘मर’ रोग आल्यामुळे कपाशी अशी वाळत आहे.sakal

अकोला : सलगच्या पावसामुळे कापसाच्या बोंडाना कोब फुटत आहेत. कापसाच्या वाती झाल्या आहेत. त्यातच दहा रुपये प्रती किलो वेचनी देवून कापूस वेचनीसाठी मजूर मिळत नसल्याने लेकरासारखा जोपासलेला कापूस मोतीमोल होताना बघून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी सुरवातीला पाऊस झाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी मिर्गातच कपाशीची लागवड केली होती. सलग दोन महिन्यांपासून सुरू असल्याने पावसामुळे शेतातील कपाशीच्या बोंड्या सडल्या. बोंड्याना कोंब फुटले. त्यामुळे कापूस उत्पादनात घट येत आहे. मूग पिकावर आलेल्या किडीने हातचे पीक गेले. त्यानंतरही शेतकरी खचला नाही.

मात्र, या आठवड्यात दोन-तीन दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेत रस्ते चिखलमय झाले. पावसामुळे शेतातील पिके घरी आणायचे मार्गच बंद झाले. अशातच कापूस फुटल्याने तो वेचून घरी आणण्यासाठी मजूर मिळेनात. दहा रूपये प्रती किलो देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची तांराबळ उडत आहे. आता काही शेतकरी मध्यप्रदेशातील मजूर बोलावून कापूस वेचण्याची सोय लावताना दिसत आहे. त्या मजुरांना राहायला घर द्यावे लागते, इंधन जमा करून द्यावे लागते, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी लागते. त्यांना वीज पुरवठा द्यावा लागतो.

 ‘मर’ रोग आल्यामुळे कपाशी अशी वाळत आहे.
महाराष्ट्र तुळशी वृंदावन; इथे गांजा पिकत नाही - संजय राऊत

आणण्यासाठी चक्क मध्य प्रदेशात एक गाडी घेऊन जावे लागते. गाडीचे सहा हजार रुपये भाडे आहे. या सर्वासाठी शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे होतात. त्यांना आणण्यासाठी आगावू रक्कम द्यावी लागते. एवढे करूनही शेतकऱ्यांना प्रती दहा रुपये किलोने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

मी यावर्षी २० एकर कपाशीची लागवड केली आहे. कपाशीचे चांगले पीक आहे; पण परतीच्या पावसाने कापूस ओला झाला आहे. एकरी तीन क्विंटलळ नुकसान झाले असून, आता वेचण्याकरिता मजूर मिळत नाही.

- प्रवीण साबळे, शेतकरी तरोडा

मी माझ्या पाच एकरात कपाशीची लागवड केली असून, कापूस वेचनीसाठी दोन ते तीन वेळा मध्य प्रदेशात गेलो. पण मजूर मिळत नसल्याने कापूस मातीत जात आहे.

- गोपाल दामोधर, शेतकरी, कावसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com