

Akola minor sexual abuse father life imprisonment sentence
sakal
अकोला : १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी पित्यास अकोट येथील विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच २५ हजार रुपयांचा दंड ठोठावून, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास भोगण्याचे आदेश दिले. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.