अकोला : कोविड रुग्ण संख्येत पुन्हा वाढ

शनिवारी नवे सात रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या ११
Akola covid patient rise 11 Active patient
Akola covid patient rise 11 Active patientsakal
Updated on: 

अकोला : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) २०० अहवाल प्राप्त झाले. त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. कोविड रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत असून, आता जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या ११ झाली आहे.

शनिवारी दिवसभरात २०० आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष व सहा महिलांचा समावेश आहे. पॉ‍झिटिव्ह रुग्णांपैकी बार्शीटाकळी येथील एक, अकोला ग्रामीण-तीन, महानगरपालिका क्षेत्रातील तीन जणांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११ सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे. मास्क वापरावे व वेळोवेळी साबनाने हात धुवावे, असा सल्ला आरोग्य विभागाद्वारे देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com