अकोला : घुसरचा कुख्यात गुंड नागेश कारागृहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

अकोला : घुसरचा कुख्यात गुंड नागेश कारागृहात

अकोला - अकोट फैल पोलिस स्टेसन अंतर्गत येणाऱ्या घुसर येथील कुख्यात गुंड नागेश उर्फ नागसेन तुकाराम गोपनारायण (३०) याचेवर एमपीडीए ॲक्ट अन्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, त्याची एक वर्षाकरिता कारागृहात रवानगी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एमपीडीए ॲक्ट अन्वये करण्यात आलेली ही ७३ वी कारवाई आहे.

नागेश गोपनारायण याच्यावर यापूर्वी दंगा करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करणे, विनयभंग करणे, गभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, चोरी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, इतरचे जिवीतास व सुरक्षिततेस धोका निर्माण करणारी कृती करणे, सामन्य लोकांचे ररस्ता अडवून त्यांना शिवीगाळ करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. त्यालाही तो जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द पोलिस अधीक्षक यांनी स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता.

या प्रस्तावाला मंजुरी देवून त्यास एक वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश ता. २५ जुलै रोजी पारीत केला. त्याचा तत्काळ शोध घेवून त्यास जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग, अकोला, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, मंगेश महल्ले यांनी व अकोट फैल येथील पोलिस निरीक्षक महेंद्र कदम, पोउपनि नितीन सुशिर तसेच पो.स्टे. तील कर्मचारी यांनीकेली.

सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई सुरूच

अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता रहावी याकरिता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करण्यात आली असून, त्यांचे विरूध्द एमपीडीए ॲक्ट खाली कारवाई प्रस्तावती आहे. माहे-जुलै २०२० ते जून २०२२ या कालावधीमध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकूण ७३ गुन्हेगारांनावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Akola Crime News Mpda Act Ghusar Gangster Nagesh Arrested In Jail

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top