esakal | कुख्यात गुंड अनिल रताळ कारागृहात स्थानबद्ध
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Crime News Notorious goon Anil Ratal lodged in jail

ईराणी झोपडपट्टीतील कुख्यात गुंड अनिल उत्तम रताळ (वय २८) याला एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.

कुख्यात गुंड अनिल रताळ कारागृहात स्थानबद्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :  ईराणी झोपडपट्टीतील कुख्यात गुंड अनिल उत्तम रताळ (वय २८) याला एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.


जबरी चोरी, घरफोडी करणे, गंभीर दुखापत करणे, खंडणी मागणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, तडीपारी आदेशाचे उल्लंघन करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, असे बरेच गंभीर गुन्हे रताळवर दाखल आहेत. त्याचेवर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

तो प्रतिबंधक कार्यवाही करुन सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवून पोलिस अधीक्षक यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. त्यानुसार मंगळवारी (ता.२३) त्याला एक वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश पारीत केला आहे. रताळला अटक करून जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!

loading image