बापाकडूनच मुलगी गरोदर, पळून गेल्याचा बनाव फसला

मुलगी गरोदर; आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Akola Crime News
Akola Crime Newssakal
Updated on: 

अकोट : नात्याला काळिमा फासणारी घटना नुकतीच अकोट शहरात उघडकीस आली आहे. सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केले. त्यामुळे मुलगी गरोदर राहिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद देणाऱ्या पित्यालाच आता अकोट शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.(Akola Crime News Fathers Rape of a minor girl)

Akola Crime News
अकाेला : मुंडगाव आरोग्य वर्धिनीत अनेक पदे रिक्त

आपली १६ वर्षाची मुलगी घरी कोणालाही न सांगता निघून गेली. तिला अज्ञात व्यक्तीने पळविल्याचा आरोप करीत अकोल्यातील रहिवाशी अल्पवयीन मुलीच्या सावत्र बापाने अकोट येथील शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. मुलीचा शोध सुरू असतानाच २० जानेवारी रोजी बेपत्ता मुलगी आपल्या आईसोबत पोलिस स्टेशनमध्ये हजर झाली. मुलीला सुरक्षित बघून पोलिसांना दिलासा मिळाला. मात्र, मुलगी व आईने घडलेल्या घटनेची आपबिती पोलिसांना सांगीतली. आणि पोलिसही धक्क झाले. अपहरणाची तक्रार देणाऱ्या सावत्र पित्याने मुलीला सात महिन्यांपूर्वी अमरावतीवरून अकोटला घरी आणले होते. (Akola Crime News)

Akola Crime News
कोल्हापूर : इचलकरंजीतही पंचगंगेत मृत मासे

या ठिकाणी तो सतत तिच्यावर बळजबरीने बलात्कार करत होता. एके दिवसी नराधाम बापाने अप्लवयीन मुलीला थंडपेयामधून दारू पाजून लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहली. सावत्र बापाच्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने अकोट येथून पलायन केले. आईजवळ जाऊन पीडितेने तिच्यावर घडलेली सर्व हकिकत सांगीतली. यामुळे आई व मुलीने अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये येऊन नराधाम बापाविरुद्ध तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी सावत्र पित्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३७६, ५०४ सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी सावत्र पित्याला शहर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असात, न्यायालयाने आरोपीला २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com