esakal | सराईत गुन्हेगाराच्या घरातून मादक पदार्थासह तलवार जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Crime News Sword with drugs seized from Sarait criminal's house

हातरुण येथील सराईत गुन्हेगाराच्या घरातून गांजा, देशीदारु व तलवारसह ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज मंगळवारी दुपारच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथक आणि उरळ पोलिसांनी संयुक्तपणे केली.

सराईत गुन्हेगाराच्या घरातून मादक पदार्थासह तलवार जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि.अकोला) : : हातरुण येथील सराईत गुन्हेगाराच्या घरातून गांजा, देशीदारु व तलवारसह ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज मंगळवारी दुपारच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथक आणि उरळ पोलिसांनी संयुक्तपणे केली. या कारवाईत पोलिसांनी चार किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


शेख जुनैद शेख मुख्तार रा. हातरुण असे गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत मुख्य आरोपी शेख जुनैद शेख मुख्तार याच्या घराात गांजा लपवण्यासाठी जागा केली होती. या ठिकाणी देशी दारूूच्या बााटल्या, गांजा लपविण्यात आला होता. याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली होती.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

त्या आधाराने उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकर व पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी शेख जुनैद याच्या घरावर छापा मारला असता सराइत गुन्हेगार शेख जुनैद याच्या घरझडती मध्ये चार किलो ३१८ ग्राम गांजा किंमत ४० हजार रुपये), गांजा विक्रीतून मिळालेले २० हजार ८२० रुपये), देशीदारुच्या ८६ बाटल्या किंमत ४ हजार रुपये), ७४ सेंटिमीटर लांबीची एक लोखंडी तलवार १ हजार रुपये), इलेक्ट्रॉनिक वजन काटा (५ हजार रुपये), एक गणयंत्र (दोनशे रुपये) असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी उरळ पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

हेही वाचा - कोरोनाचा विस्फोट; एकाच रात्रीत अवघे गाव झाले हॉटस्पॉट

शेख जुनैद हा सराईत गुन्हेगार
उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हातरुण येथील शेख जुनैद हा २८ वर्षीय युवक सराईत गुन्हेगार असून काही दिवसांपुर्वीच त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कारागृहातून तो नुकताच जामीनावर सुटून आला आहे. तर यापुर्वी उरळ पोलिस स्टेशन मध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!

loading image