अरे हे काय? गायरान जमिनीसाठी त्यांनी घेतली कागदोपत्री फारकत, स्वतंत्रदिनी दिला आत्मदहनाचा इशारा

Akola Deulgaon Raja Gairan for land, he took the documents, gave a warning of self-immolation on Independence Day
Akola Deulgaon Raja Gairan for land, he took the documents, gave a warning of self-immolation on Independence Day

देऊळगाव राजा  ः तालुक्‍यातील सुरा येथील ई- क्‍लास गायरान जमीनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या प्राप्त केलेला भाडेपट्टा रद्द करून सदर जमीन शासन जमा करावी अशी मागणी तालुक्‍यातील सुरा येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र साळवे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणी संदर्भात दखल न घेतल्यास स्वातंत्र्यदिन आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरणात घटस्पोट झाल्याचा लिहून देणारे दाम्पत्य आजही पती-पत्नी असल्याचा दावा निवेदन कर्त्याने केला आहे.


तालुक्‍यातील सुरा येथील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण करून शासनाकडून भाडेपट्टा मिळविण्यासाठी शेता दाम्पत्याने स्वतः हरकत झाल्याचे स्टॅम्प पेपर जोडून शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार रामचंद्र साळवे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

सुरा येथील साहेबराव चेके व अनुसया साहेबराव चेके लग्नापूर्वीचे नाव (अनुसया सखाराम भोपळे) या पती पत्नी यांचा घटस्फोट बेकायदा असताना व आजही ही सदर दांपत्य पती-पत्नी म्हणून एकत्र राहत असताना संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी शासनाचे आदेश धाब्यावर बसवुन प्रतेकी 5 एकर भाटेपट्टा देऊन शासनाची दिशाभुल केल्याचे तहसीलदार यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जमीनीचा भाटेपटा रद्द करुन वरीष्ठ स्तरावरुन चौकशी समिती नेमुन संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांचे वर निलंबनाची प्रशासकीय कार्यवाही करावी अन्यथा कार्यवाही न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी महसुल कार्यालयावर कोणत्याही क्षणी आत्मदहन करण्याचा ईशारा सुरा येथील रामचंद्र साळवे यांनी दिला आहे. सदर तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, 14 एप्रिल 1990 रोजी अस्तीत्वात असलेली अतिक्रमने नियमाकुल करण्याचा शासनाचा आदेश असल्यामुळे पाञ लाभार्थ्याची यादी तहसिलदार यांच्या कडुन जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या यादीत सदर लाभार्थ्याचे नांव नसुन बनावट अतिक्रमण दाखवुन तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन दहा एकर जमिन भाडापट्याने मिळवुन दिली आहे. याच बरोबरच ईतरही एका बनसोडे नामक व्यक्ती लाही भाडेपट्टा मिळवुन दिला आहे ऊर्वरीत गायरान जमिनीवर 10 ते 12 लोकांनी जमिनीची मशागत केली असून ते अतिक्रमण करुन पेरणी करण्याच्य मनस्थीतीत आहे.

गावातील जनावरांच्या सराई चा प्रश्न उद्भवू नये म्हणून शासनाने तत्काळ कारवाई करून बेकायदेशीर भाडेपट्टा रद्द करावा तसेच शासनाची दिशाभुल व फसवणूक करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकारी केलेल्या बेकायदेशीर कामाची चौकशी करून प्रशासकीय निलंबनाची कारवाई करावी अन्यथा 15 आँगस्ट रोजी महसुल विभागाच्या जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयवर आत्मदहन करण्याचा इशारा रामचंद्र साळवे यांनी 18 जुलै रोजी तहसिलदार यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

जमिनीसाठी पती-पत्नीचा घटस्पोट
शासनाकडून फारकत झालेल्या महिलेला शासकीय जमीन माहिती साठी मिळत असल्याने केवळ गायरान जमीन मिळवण्यासाठी कागदोपत्री स्टॅम्पवर फारकतनामा तयार करून महसूल विभागाकडे दिलेल्या फाईलमध्ये जोडण्यात आला. प्रत्यक्षात मात्र आजही सदर जोडपं पती-पत्नी म्हणून एकत्र सुखी संसार करीत आहेत.
(संपादन-विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com