

Deputy Chief Minister Eknath Shinde addressing a public gathering in Akola.
Sakal
अकोला: अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू देणार नाही. शहरातील सुरू असलेल्या तसेच प्राधान्याने हाती घ्यावयाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोल्यातील जाहीर सभेत दिले. शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणारी लोकाभिमुख पक्ष असल्याचे सांगत, राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची जबाबदारी आपण स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.