
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
अकोला : कोरोना संसर्ग तपासणीचे बुधवारी एकूण ९१७ अहवाल प्राप्त झालेत. त्यातील ८६९ अहवाल निगेटीव्ह तर ४८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. एकाचा रुग्णाचा उपचार घेताना रुग्णालयात मृत्यू झाला.
हे ही वाचा : जिल्ह्यात चार ऑनलाईन रोजगार मेळाव्यातून ७९ युवकांना रोजगार
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी, चोहट्टा बाजार व न्यू आळशी प्लॉट येथील प्रत्येकी तीन, राम नगर, दुर्गा चौक, गीता नगर, वर्धमान नगर व उरळ ता. बाळापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पीकेव्ही, दिनोडा, मूर्तिजापूर, कृषिनगर, अकोट, मलकापूर, न्यू तापडीयानगर, आरोग्यनगर, जठारपेठ, कौलखेड, लहान उमरी व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. बुधवारी सायंकाळी १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दोनद खु. ता. बार्शीटाकळी व तेल्हारा येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाळापूर रोड, अकोट, चंद्रिकापूर ता.अकोट, पारद व राऊतवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
उरळ येथील एकाचा मृत्यू
बुधवारी एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण उरळ ता. बाळापूर येथील ६० वर्षीय पुरुष आहे. तो (ता.१४) डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
नऊ जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात व आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, अशा एकूण नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले