
अकोला : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाला ब्रेक लागल्यामुळे वाळू माफिया चाेरट्या मार्गाने अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीसह गौण खनिजांचे चोरट्या मार्गाने उत्खनन, वाहतूक करत आहेत. अवैध उत्खननावर आळा घालण्यासाठी एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अखेर पर्यंत १०९ कारवाया करण्यात आल्या आहेत. संबंधितांवर १ कोटी ७३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून शासनाच्या तिजाेरीत ८३ लाख ८२ हजार रुपयांचा दंड जमा करण्यात आला आहे. त्यानंतर सुद्धा अवैध वाळू उत्खनन कमी हाेत नसल्याचे चित्र आहे.