Radhakrishna Vikhe Patil : आता नगरहून चालणार अकोला जिल्ह्याचा कारभार!

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अकोल्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे.
radhakrishna vikhe patil
radhakrishna vikhe patilsakal

अकोला - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अकोल्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. यापूर्वी पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. त्यामुळे नागपूर येथून चालत असलेला अकोला जिल्ह्याचा कारभार आता थेट अहमदनगर येथून चालविला जाणार आहे.

राज्यात नव्याने पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. त्यात अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले पालकत्व आता महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यासाठी हा निर्णय म्हणजे ‘आगीतून निघाले आणि फुफाट्यात पडले’ अशी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

केवळ एकदाच घेतली बैठक

अकोला जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले सव्वा वर्षात केवळ एकदाच प्रत्यक्ष अकोला येथे बैठक घेतली. त्यानंतर ते थेट ७ ऑक्टोबरलाच अकोल्यात येणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच अकोल्याला जिल्ह्याचे पालकत्व त्यांच्याकडून निघाले आहे.

आता ३५० किलोमीटर जावे लागणार

अकोला ते नागपूर हे अंतर २५० किलोमीटर होते. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भाजप नेत्यांची जवळीक असल्याने जिल्ह्यातील कामे तातडीने होत होती. आता मात्र थेट अहमदनगरला ३५० किलोमीटरचा प्रवाश करून जावे लागणार आहे.

२५० किलोमीटर अंतर असूनही वर्षभरात एकाद बैठक घेणारे उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्यानंतर ३५० किलोमीटर लांबवर असलेले महसूल मंत्री विखे पाटील हे अकोला जिल्ह्यासाठी किती वेळ देतील, याबाबत उत्सुकता आहे.

नवे पालकमंत्री या आठवड्यातच अकोल्यात?

अकोला जिल्ह्यातील विकास कामांचे नियोजित लोकर्पण व भूमिपूजनचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवार, ता. ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यामुळे नवे पालकमंत्री विखे पाटील या कार्यक्रमाच्या निमित्ताने या आवड्यात अकोला जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com