अकोला : जिल्ह्यात संततधार पावसाने नदी-नाल्यांना पूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

अकोला : जिल्ह्यात संततधार पावसाने नदी-नाल्यांना पूर

अकोला : केले आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी-नाले दुधढी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक बाळापूर तालुक्यातील अनेक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा नदी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पात्रातही वाढ झाली आहे.

अकोला जिल्ह्यात गत २४ तासांत सरासरी ३१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यात रिमझिम पाऊस झाली आहे. कुठे मुसधार तर कुठे रिमझिम पडणाऱ्या पावसांची संततधार सुरू असल्याने जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्यातील नदी-नाल्यांची पातळी वाढली आहे. विशेषतः बाळापूर तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

पूर्णा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. त्यातच अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पूर्णा नदीवर असलेल्या विश्रोळी प्रकल्पाचे पाणी पूर्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आले असल्याने अकोला जिल्ह्यात पूर्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

सर्तकतेचा इशारा

कार्यकारी अभियंता पूर्णा प्रकल्प यांचे संदेशनुसार पूर्णा मध्यम ता. चांदूर बाजार प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

झाल्यामुळे या प्रकल्पातून ३० क्युमेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीमध्ये करण्यात येत आहे. पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास धरणामधून विसर्ग वाढविला जाऊ शकतो. तरी सर्व यंत्रणांनी संर्तक रहावे व नदी काठवरील गावातील ग्रामस्थांनी सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सांडव्यावरून वाहले पाणी;

बंद मार्गावरील वाहतुक सुरळीत

बाळापूर तालुक्यात नवा अंदुरा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन वाहणारे पाणी नागद, सागद, कारंजा, रमजानपूर, हातरुण या रस्त्यावरील पुलावरून जात असल्याने गुरुवार, ता. १४ जुलै रोजी सकाळी १० वाजतापासून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता पाणी ओसरले असल्याने वाहतुक सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

अकोला जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस (मि.मी.)

अकोट ः २८.०

तेल्हारा ः २८.१

बाळापूर ः ३१.८

पातूर ः ४८.०

अकोला ः ३१.४

बार्शीटाकळी ः ३०.७

मूर्तिजापूर ः ३१.८

सरासरी ः ३२.१

Web Title: Akola District Rivers Nallas Flooded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..