अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘बोलका वॉर्ड’ - बच्चू कडू

पालकमंत्री बच्चू कडू : रुग्णालयातील सर्व वॉर्डात आधुनिक सुविधा निर्माण करणार
Akola District Women Hospital Bolka Ward Bachchu Kadu
Akola District Women Hospital Bolka Ward Bachchu Kadusakal
Updated on

अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयातील बोलका वॉर्डाप्रमाणेच रुग्णालयातील सर्व वार्डात आधुनिक सोईसुविधा निर्माण करू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

जिल्हा स्त्री रुग्णालयातील ‘बोलका वार्डाचे’ लोकार्पण पालकमंत्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पाटोकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, डॉ. संगीता साने, प्रशाकीय अधिकारी आप्पा डावरे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उपस्थित होते.

Akola District Women Hospital Bolka Ward Bachchu Kadu
हात चालाखी करत भरदिवसा साडेचार लाखांचे दागिने लंपास

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयातील दोन स्वतंत्र ‘अक्षरा व आनंदी’ वार्डाचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व नर्सेच्या सहकार्याने बोलका वार्ड अत्यंत सुंदर व सर्व सोईसुविधायुक्त निर्माण झाले असून, यांचा लाभ जिल्ह्यातील महिला व नवजात बालकांना होईल. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना नक्कीच या सुविधेमुळे आनंद घेवूनच जाईल. अशा प्रकारच्या वार्डाचे निर्माण रुग्णालयातील सर्व वार्डात करणाचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

महिला व नवजात शिशूच्या सर्वागिण विकास व आरोग्य शिक्षणाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय हे प्राण वाचविण्यासह जीवनिर्मिती करण्याचे पवित्र ठिकाण, असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले.

Akola District Women Hospital Bolka Ward Bachchu Kadu
रुग्णांच्या जिवाशी खेळ; रुग्णवाहिका डॉक्टरविना धूळखात

आरोग्य शिक्षणावर भर

प्रसुतिनंतर माता व नवजात बालकाना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागतात. या समस्या आरोग्य शिक्षणाच्या अभावी निर्माण होत असून, या समस्यांच्या निराकरणासाठी आरोग्य शिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. याकरिता जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ४० खाट क्षमतेच्या ‘अक्षरा व आनंदी’ अशा दोन बोलक्या वार्डाची निर्मिती करण्यात आले. यावार्डात विविध फलके, चित्र, बॅनर, डिजीटल सूचना बोर्ड, म्युझिक सिस्टिम व एलईडी टिव्हीच्या माध्यामातून आरोग्य शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये स्तनपान कसे करावे, मातेचा पोषण आहार, बाळाची काळजी, स्त्रीयामधील कर्करोग, मानसिक आजार, कुंटुंब नियोजन व विविध आजारापासून बचावासंबंधीची माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com