
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात ३१ जानेवारीपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आदेश कायम ठेवण्यात आले असून त्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली.
अकोला : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात ३१ जानेवारीपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आदेश कायम ठेवण्यात आले असून त्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली.
त्याअंतर्गत सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस यांना त्यांचे वर्ग १ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्याकरिता परवानगी देण्यात येत आहे.
हेही वाचा - अफलातून प्रयोग; आता रस्त्यावर धावणारपाण्यावर चालणारी मोटसरायकल
खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस यांनी त्यांचे वर्ग सुरू करताना प्रत्येक बॅचमध्ये नियमीत आसन क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २० विद्यार्थी राहतील.
हेही वाचा - आईवडीलांना सांभाळा, अन्यथा ३० टक्के पगार वळविणार!
तसेच दोन बॅचच्या मध्ये अर्धा तासाचा अवकाश ठेवून प्रत्येक वेळी हॉल व रुमचे तसेच संगणक साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहिल. कोविड-१९ चे अनुषंगाने केन्द्र शासन व राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहिल.
हेही वाचा - शैक्षणिक शुल्काची पठाणी वसुली, शिक्षक विनापगार; शाळा बंद शुल्क सुरू
या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या विविध आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची संबंधित संचालकांनी व संस्थेने दक्षता घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा