आईवडीलांना सांभाळा, अन्यथा ३० टक्के पगार वळविणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Washim News Take care of parents, otherwise salary will be diverted! Zilla Parishad Washim Speaker Reshma Gaikwad

 वृध्द आईवडीलांची परवड ही आता सार्वत्रिक बाब झाली. त्यात नोकरदार मुलांसाठी तर वृध्द आईवडील अडगळ ठरतात. मात्र, आता वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आईवडीलांना सांभाळावेच लागणार आहे.  

आईवडीलांना सांभाळा, अन्यथा ३० टक्के पगार वळविणार!

वाशीम :  वृध्द आईवडीलांची परवड ही आता सार्वत्रिक बाब झाली. त्यात नोकरदार मुलांसाठी तर वृध्द आईवडील अडगळ ठरतात. मात्र, आता वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आईवडीलांना सांभाळावेच लागणार आहे.  

जे नोकरदार आईवडीलांचा सांभाळ करणार नाहीत त्यांचा ३० टक्के पगार आईवडीलांच्या खात्यात वळता करणारा हा ठराव सर्वानुमते पारित झाला. सभापती रेश्मा गायकवाड यांच्या ठरावाने हा ठराव पारित करणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.

हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप


वृध्द आईवडील सांभाळणे हा विषय कौटुंबिक बाबतीत अतिशय संवेदनशिल झाला आहे. महानगरात तर वृध्दाश्रमासारखे काळे डाग अभिमानाने मिरविले जातात. ग्रामीण भागात काही प्रमाणात संयुक्त कुटुंब व्यवस्था कशीबशी तग धरून आहे. मात्र ज्या वृध्द मातापित्याचे अपत्य नोकरीनिमित्त शहरात स्थिरावले ते गावाकडे असलेल्या आईवडिलांकडे फिरूनही पाहत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा - बातमी वाऱ्यासारखी पसरली; ऐंशी फुट खोल विहिरीत घडलं काय?

ग्रामीण भागात फिरत असताना वाशीम पंचायत समितीच्या सभापती रेश्मा गायकवाड यांनी ही परिस्थिती पाहिली. जिल्हा परिषद व पंचायत समितीमधे अंतर्गत असलेलं काही कर्मचारी हे आई वडिलांची सेवा करत नसल्यामुळे त्यांची अवहेलना होत आहे, ही बाब लक्षात घेऊन सभापती रेश्मा गायकवाड यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव मांडला.

हेही वाचा - 21 वर्षांत चार नाही तर चौदा झालेत सरपंच

या ठरावामधे असे नमुद करण्यात आले होते की, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कार्यरत जे कर्मचारी आईवडीलांचा सांभाळ करणार नाहीत त्या कर्मचाऱ्यांच्या नियमित मासिक वेतनातून ३० टक्के रक्कम त्यांच्या आईवडीलांच्या खाती जमा करावी. हा ठराव पटलावर येताच सर्व सदस्यांनी या ठरावाला पाठींबा देवून ठराव सर्वानुमते मंजूर केला. या ठरावाबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी विशेष कौतूक केले.

हेही वाचा - जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक; डॉ. संतोष कोरपे यांच्यासह ७ संचालक अविरोध, ११ उमेदवारी अर्ज नामंजूर

मी सभापती या नात्याने तालुक्यातील काही गावांचा दौरा करत असताना माझ्या लक्षात आले म्हणून मी जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये हा विषय मांडला. त्यानुसार कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पगारामधून ३० टक्के पगार आई वडिलांचा बैंक खात्यात वर्ग करावा, असा ठराव होता. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
- रेश्मा गायकवाड, सभापती, पंचायत समिती वाशीम

(संपादन - विवेक मेतकर)

क्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या

Web Title: Akola Washim News Take Care Parents Otherwise Salary Will Be Diverted Zilla Parishad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaWashim
go to top