Akola Educational: एक लाख ४० हजार विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’; शालेय शिक्षण विभागाचा लेट्स चेंज उपक्रम

महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
swach bharat mission
swach bharat mission sakal
Updated on

अकोला : शालेय शिक्षण विभागामार्फत लेट्स चेंज उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवण्यात येत आहे. याचा शुभारंभ मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापना मधील एकूण एक हजार ४३४ शाळांमधील एक लाख ४० हजार ३५२ विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्स बनून नजर ठेवतील. त्यात त्यांना पालक सुद्धा हाथभार लावतील.

swach bharat mission
E-Rickshaw : इ-रिक्षासाठी महापालिकेने चार्जिंगची सुविधा द्यावी - चंद्रकांत पाटील

महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवश्यकता लक्षात येऊन त्याची सवय लागावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनाच ‘स्वच्छता मॉनिटर्स’ म्हणून जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

यासाठी मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम राबविण्यात येईल.

दोन ऑक्टोबर रोजी शालेय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांना व्हीडिओ संदेशाद्वारे संबोधित करून स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारणे या कल्पनेचा परिचय करून देतील.

swach bharat mission
D-Gang : ‘डी-गॅंग’शी अनंत जैनचा संबंध?

त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेटस् चेंज’ हा ७५ मिनिटांचा स्वयंस्पष्टीकरणात्मक मनोरंजनात्मक चित्रपट प्रसारित केला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लोकप्रिय व्यक्तींच्या व्हीडिओ संदेशाद्वारे देखील कृती योजनेच्या आराखड्याची माहिती देण्यात येणार आहे.

उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार

या उपक्रमांतर्गत निष्काळजीपणे कचरा करणाऱ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ झालेले विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व लक्षात आणून देतील. स्वच्छतेबाबत सातत्याने प्रचार प्रसार झाल्यामुळे निष्काळजीपणे कचरा करणाऱ्यांमध्ये सुधारणा होऊन परिसर स्वच्छ राहील तसेच सफाई कर्मचाऱ्यांवरील भार देखील कमी होईल.

swach bharat mission
R Praggnanandhaa : आनंद महिंद्रा ग्रँडमास्टर प्रग्नानंदला भेट म्हणून देणार इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून बसेल धक्का...

या उपक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या ‘स्वच्छता मॉनिटर्स’ यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

नोडल अधिकाऱ्यांवर जबाबदारी

जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बी. वैष्णवी यांच्या मार्गदर्शनाने शिक्षणाधिकारी (प्राथमिख व माध्यमिक) डॉ. सुचिता पाटेकर यांनी प्रकल्प यशस्वी पणे राबवण्याची तयारी केली आहे. जिल्ह्यात लागणारे सर्व नियोजन आणि शाळांसोबत समन्वय साधण्याची जबाबदारी अब्दुल अलिम देशमुख (वि.अ.शि.जि.प.) नॉडल अधिकारी यांच्यावर सोपवण्यात अली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com