अकोला : उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ‘वंचित’ची सरशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ‘वंचित’ची सरशी

अकोला : उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ‘वंचित’ची सरशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यातील बाळापूर वगळता इतर सहा पंचायत समितीच्या उपसभापती पदांसाठी निवडणुकीची प्रक्रिया गुरुवारी (ता. १८) पार पडली. निवडणुकीत रिक्त सहा जागांपैकी चार जागी वंचितचे उमेदवार विजयी झाले, तर बार्शीटाकळीमध्ये भाजपच्या संगीता जाधव, मूर्तिजापूरमध्ये शिवसेनेचे देवाशीष भटकर यांची निवड करण्यात आली. ईश्वरचिठ्ठीने देवाशीष भटकर व अर्चना डाबेराव (पातूर) यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.

ओबीसी आरक्षणामुळे जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, अकोला, बार्शीटाकळी व पातूर पंचायत समितीच्या उपसभापतींचे पद रिक्त झाले होते. त्यामुळे सदर पदांसाठी पोटनिवडणुक घेण्यात आली. त्यामध्ये विजय झालेल्या सदस्यांमधून उपसभापतींची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सहा तालुक्यातील उपसभापती पदांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात निवडणुकीप्रक्रिया पार पडली. त्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

त्यानुसार सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रांचे वाटप करुन नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले. त्यानंतर दुपारी ३ वाजता निवडणुकीची प्रकिया पार पडली. त्यामध्ये मूर्तिजापूर व पातूरमध्ये उपसभापतींची निवड ईश्वरचिठ्‍ठीने करण्यात आली.

वंचितचे राजेश वावकार यांची ११ मतांनी निवड

अकोला : अकोला पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी वंचितच्या वतीने राजेश वावकार, तर शिवसेनेच्या वतीने शुभांगी भटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी अर्ज कायम ठेवल्याने दुपारी ३ वाजतानंतर मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानामध्ये वंचितचे उमेदवार राजेश वावकार यांना ११ मते मिळाली, तर शिवसेनेच्या शुभांगी भटकर यांना ९ मते मिळाली. त्यामुळे बहुमताने उपसभापतीपदी वंचितचे राजेश वावकार यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून अकोला तहसीलदार सुनील पाटील उपस्थित होते.

ईश्वरचिठ्ठीने महाविकास आघाडीचे भटकर विजयी

मूर्तिजापूर ः मूर्तिजापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी महाविकास आघाडीचे देवाशीष भटकर यांची ईश्वरचिठ्ठीने निवड करण्यात आली. ओबीसी आरक्षण रद्द होऊन उपसभापतींसह ४ पं.स. सदस्यांची पदे रिक्त झाली होती. त्यासाठी पोटनिवडणुनंतर उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने देवाशीष भटकर व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नकुल काटे यांनी उमेदवारी दाखल केली होती. महाविकास आघाडी व वंचितच्या उमेदवारांची सदस्य संख्या समान असल्याने हात वर करुन पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत उपसभापती पदाच्या दोन्ही उमेदवारांच्या बाजूने ७-७ अशी समान मते पडली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली व उपसभापती पदी देवाशीष शरद भटकर यांची मूर्तिजापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार प्रदीप पवार यांनी काम पाहिले.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

पंचायत समितींचे नवनिर्वाचित उपसभापती

पंचायत समिती उपसभापती

बार्शीटाकळी संगिता जाधव (भाजप)

अकोला राजेश वावकार (वंचित)

तेल्हारा मोबिन सिद्धीकी (वंचित)

अकोट वैशाली राऊत (वंचित)

मूर्तिजापूर ईश्वरचिठ्ठी-देवाशीष भटकर (शिवसेना)

पातूर ईश्वरचिठ्ठी अर्चना डाबेराव (वंचित)

loading image
go to top