"मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis
"मी पुन्हा येतेय, काही तरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

"मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी "काहीतरी तुफानी करुयात, मी पुन्हा येत आहे" असं म्हटलं आहे. त्यांचं हे ट्विट अनेकांनी रिट्विट केलं असून यावर अनेक कमेंटही आल्या आहेत.

अमृता फडणवीस ट्विटमध्ये म्हणाल्या, "आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम.... मी पुन्हा येत अहे !!!" त्यांच्या या ट्विटवर आलेल्या कमेंट्सवरुन त्या एखादं नवीन गाण घेऊन येतील असं काहींना वाटतंय. तर देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या प्रसिद्ध वाक्यावरुन एकानं त्यांना टोला लगावलाय. त्यानं म्हटलं "ते पंत येणार होते मागच्या दोन वर्षांपासून 'मी पुन्हा येईन' त्यांना आधी येऊ द्या"

हेही वाचा: गोपीचंद पडळकर,तानाजी पाटलांचा अर्ज फेटाळला ; आटपाडीत पोलिस तैनात

दरम्यान, अमृता फडणवीस या एक बँकर असून अॅक्सिस बँकेत त्या उच्चपदावर काम करत आहेत. तसेच त्यांना गायनाची आवड असून त्यांनी पार्श्वगायनही केलं आहे. सामाजिक कार्यातही त्या सक्रीय आहेत. आपल्या राजकीय विधानांमुळे त्या कायम चर्चेत राहिल्या आहेत.

loading image
go to top