अकोला : शहरातील ४८० झेंडे, ६२ फलक काढले

मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई
Akola Encroachment Department team removed 480 flags 62 advertising baner
Akola Encroachment Department team removed 480 flags 62 advertising banersakal
Updated on

अकोला : महानगरपालिका हद्दीत विविध मार्गावर लावण्यात आलेले अनधिकृत फलक व झेंडे काढण्याची कारवाई अतिक्रमण निर्मुलन पथकाने केली. बुधवारी एकाच दिवशी शहरातील ४८० झेंडे व ६२ फलक पथकाने काढले.

विविध जाती, धर्माच्या उत्सवाच्या निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यांवर झेंडे लावले जातात. उत्सव संपल्यानंतरही ही झेंडे काढण्याची खबदारी कुणी घेत नाही. अलिकडे देशाच्या काही भागात झेंडे लावणे व काढण्यावरून दोन धर्मांमध्ये झालेले वाद बघता अकोला शहरातही ही स्थिती निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिका अतिक्रमण निर्मुलन पथकाने बुधवारी शहरभर झेंडे व अनधिकृत फलक काढण्याची मोहीम राहबिली.

यात शहरातील मुख्य रस्त्यावरील सुमारे ४८० झेंडे पथकाद्वारे काढण्यात आली. सोबतच वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने लावण्यात आलेले ६२ फलकही अतिक्रमण निर्मुलन पथकाने काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com