

Akola
esakal
अकोला: गांधी चौक परिसरातील चौपाटीवर गुरुवारी (ता.५) एका महिलेला व कुटुंबियांना गुंडगिरी करत काही युवकांनी मारहाण केली होती. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी कारवाई करत चौपाटी परिसर आणि इंदोर गल्ली येथील अतिक्रमणे हटवून परिसर अतिक्रमणमुक्त केला.