

Ethanol Petrol Seized in Akola Raid 20 Barrels and 2945 Litres Petrol Found Stored Illegally in Shed
esakal
-योगेश फरपट
अकोला : अकोला-दर्यापूर मार्गावरील आपातापा गावाच्या हद्दीत एका शेडमध्ये बेकायदेशीररीत्या लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील इथेनॉल साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून जप्त केला. या कारवाईत २०० लिटर क्षमतेचे इथेनॉलने भरलेले २० प्लास्टिक बॅरेल तसेच इथेनॉलचा वास असलेले ४१ रिकामे बॅरेल असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच कारवाईत आढळून आलेला २ हजार ९४५ लिटर अवैध पेट्रोलचा साठाही पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आला.