
अकाेला : वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान
मानोरा : तालुक्यातील आसोला (खुर्द) शेत शिवारातील शेत सर्व्हे नंबर १४३ मधील ५ एकर शेतशिवारात दि. १८ जुलैच्या रात्री रोहीचे कळप शेतात घुसून सोयाबीन, तूर पिकांची नासाडी केली आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी व पंचनामा पंचनामा करून वन विभागाने शासनाची आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन वनपरीक्षेत्र अधिकारी यांना पीडित शेतकरी सुरेश रतीराम राठोड यांनी दिले आहे.
आसोला (खुर्द) शिवारात ७ एकर शेती आहे. सदर शेती वन भागाला लागून असून शेतात सोयाबीन, तुरची पेरणी केली आहे. मी दररोज शेतात पिक जागलकरिता शेतात जातो, मात्र दि. १८, १९ जुलैच्या रात्री संततधार पाऊस असल्याने शेती जागलसाठी रात्रीच्या सुमारास जाऊ शकलो नाही.
शेतात कोणीच पीक रखवालीसाठी कोणी नसल्यामुळे रात्रीच्या वेळी रोही या प्राण्यांच्या कळपाने शेतात घुसून पिके फस्त करीत अतोनात नुकसान केले आहे. पाहणी व पंचनामा करून वन विभागाने शासनाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे.
आसोला (खुर्द) भागात अनेक शेतकऱ्यांची वनभागाला लागून शेती आहे. या शेतात रात्रीच्या वेळी रोही व रानडुक्कर यांचे कळप उभ्या शेतातील पिके फस्त करत नासाडी करीत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा पंचनामा करून वन विभागाने शासनाची आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे गटनेते गोपाल पाटील भोयर यांनी केली आहे.
Web Title: Akola Farmer Compensation Demand Crops Damage By Wild Animals
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..