अकोल्यात कर्जाच्या वसूलीसाठी शेतकऱ्याचं घर सील करताच बच्चू कडू संतापले! थेट हातोडा घेतला अन्...

Farmer's House Sealed Over Loan Recovery in Akola : अकोल्यातील निंबा गावात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याचे घर सील करण्यात आले; आमदार बच्चू कडू यांनी हातोड्याने कुलूप तोडून घर उघडले
Bachchu Kadu

Bachchu Kadu breaks the lock on farmer Gopal Rathod's sealed house in akola

esakal

Updated on: 

अकोला : दुष्काळामुळे शेतीचे नुकसान, डोक्यावर वाढलेले कर्ज आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबावर अखेर स्वतःच्या घराबाहेर राहण्याची वेळ आली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबा गावात गोपाल राठोड यांच्या घरावर कर्जवसुलीसाठी जप्तीची कारवाई करण्यात आली. महिंद्रा रुरल होम फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड थकल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार घराला सील लावण्यात आले. या कारवाईमुळे राठोड कुटुंबाला रात्र उघड्यावर काढावी लागली. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी गावात पोहोचून घराचे सील तोडत कुलूप उघडले. या घटनेनंतर राठोड कुटुंबीय भावूक झाले.

Loading content, please wait...