esakal | Akola: चिखलातच सोयाबीनची सोंगणी; शेतकऱ्यांची परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीनची सध्या सोंगणी सुरू

अकोला : चिखलातच सोयाबीनची सोंगणी; शेतकऱ्यांची परीक्षा

sakal_logo
By
शरद येवले

मंगरुळपीर (जि. अकोला) : राज्यात यंदा पावसाने सर्वीकडे हाहाकार माजवला होता. त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. हातचे आलेले पीक गेले असल्याची परिस्थिती मंगरुळपीर तालुक्यातील काही भागात पाहावयास मिळत आहे. मात्र, येथील महसूल विभागाचे अधिकारी फक्त कार्यालयात बसून आकडेवारी करण्यात धन्यता मानत आहेत.

नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंदी सोयाबीनला आहे. त्यानंतर तूर आणि इतरही पीक काही शेतकरी घेत असतात. परंतु, यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावून जेव्हा सोयाबीन काढणीला आले तेव्हा हाहाकार केला. शेतकऱ्यांना शेतात सुद्धा जाता येत नव्हते, एवढ्या प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आणि येथेच शेतकऱ्यांची कंबर मोडली.

हेही वाचा: आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

सोयाबीनचे एकरी उत्पादन पार कोडमडले. लावलेला खर्चही मिळतो का नाही याची चिंता शेतकऱ्यांना होऊ लागली होती. उत्पादन आणि उत्पन्न याचा ताळमेळ पावसात वाहून गेला. मंगरुळपीर तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन सोंगणीकरिता जाण्यासाठी मजुरांना अक्षरशः चिखलातून जावे लागले तर, काही ठिकाणी चिखलातच सोंगणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली.

बाजारात सुरुवातीला सोयाबीनला चांगला भाव मिळाला. परंतु, अचानक भाव गडगले. त्यामुळे शेतकरी आस्मानी तर, नंतर व्यापारी संकटात सापडला. अनेक ठिकाणी मजुरांना मजुरीही स्वतः जवळून द्यायची वेळ बळीराजावर येऊन ठेपली. तालुक्यातील महसूल विभागाच्या निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे त्यांना नुकसान भरपाईपासूनही वंचित राहण्याची वेळ येऊ शकते, अशी वास्तविकता मंगरुळपीर तालुक्यात आहे.

loading image
go to top