
अकोला : पावसाळ्याच्या आगमनापूर्वी शेतीची तयारी करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. उन्हाच्या कडाक्यातही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर शेतांमध्ये चालू असून, कुणी जमीन नांगरत आहे तर कुणी गाडण करून जमिनीत साठलेली ओल साठवण्याचा प्रयत्न करत आहे.