Crop Insurance Scheme: पिक विमा योजनेअंतर्गत मिळाली तुटपुंजी रक्कम; काेणाला ५ तर काहींना २१ रुपये, शेतकऱ्यांचे निवेदन
Farmers return crop insurance money in protest: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेली अत्यल्प मदत म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. काहींना केवळ ५ तर काहींना २१ रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
अकोला : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले पैसे हे शेतकऱ्यांची आर्थिक थट्टा करणारी आहेत असा आराेप करीत शेतकऱ्यांनी पैसे धनादेशाद्वारे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना परत केले.