Akola News : बांधकामचा बेताल कारभार गाजला

जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा; अभियंत्यांवर प्रश्नांची सरबत्ती
Akola General Meeting of Zilla Parishad Construction fraud
Akola General Meeting of Zilla Parishad Construction fraud sakal

अकोला : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागाच्या बेताल कारभाराव ताशेरे ओढण्यात आले. विरोधकांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर प्रश्नांचा भडिमार करत बेताल कारभाराचा पाढाच वाचला.

कामवाटप समितीच्या बैठकीपूर्वीच कार्यकारी अभियंत्यांची स्वाक्षरी नसलेली यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काम वाटपासाठी निश्चित करण्यात आलेली कामे कामवाटप समितीच्या बैठकीत न ठेवता कमी व बदल करून कामे ठेवण्यात आल्यामुळे त्यावर शिवसेनेचे जि.प. सदस्य गोपाल दातकर यांनी आक्षेप नोंदवला. यावर कार्यकारी अभियंत्यानी चूक झाल्याचे मान्य करत चाैकशी, तपासणी करण्यात येईल, असे सभेत सांगितले.

जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीची गुरुवारी (ता. २९) आयोजित करण्यात आली हाेती. समितीच्या बैठकीपूर्वी कामांमध्ये अचानक बदल करण्यात आला. त्यावर काही कंत्राटदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे गोंधळझाल्याने सभा तहकूब करण्यात आली.

दरम्यान शुक्रवारी (ता. ३०) पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ यांनी काम वाटप समितीची सभा तहकूब का करण्यात आली, यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर कार्यकारी अभियंता अरबाड यांनी एकूण १७९ कामे हाती घेण्याचे नियाेजन होते, मात्र काही कामे सुटली.

त्यामुळे कंत्राटदार संघटनेने आक्षेप नाेंदवला. परिणामी सभा तहकूब करण्यात आली, असे सांगितले. कामवाटपापूर्वीच कामांना प्रशासकीय मंजुरी नसताना, कामांच्या यादीवर कार्यकारी अभियंत्यांची स्वाक्षरी नसतानाही त्याची यादी नाेटीस बाेर्डावर का लावण्यात आली, असा प्रश्न शिवसेनेचे गट नेते गाेपाल दातकर यांनी उपस्थित केला.

याबाबत चौकशी करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता यांनी सभेत सांगितले. सभेत जि.प. अध्यक्षा संगिता आढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, संजय नाईक, याेगिता राेकडे, रिजवाना परिवीन, वंचितचे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यासह सदस्य उपस्थित हाेते.

अध्यक्षांनी खात्याकडे लक्ष देण्याची सूचना

बांधकाम विभागात कामे चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते गाेपाल दातकर यांनी केला. आता महिनाभर आचार संहिता असून, नंतर घाईत कामे केल्यास दर्जावर परिणाम हाेणार आहे. झालेल्या कामांचे देयक काढण्याचा प्रकार हाेत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान बांधकाम खाते जि.प. अध्यक्षांकडे असल्याने त्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना अपक्ष सदस्य गजानन पुंडकर यांनी सभेत केली.

नववर्षापासून मिळेल पाेषण आहार

गत दीड वर्षापासून बंद असलेल्या शालेय पोषण आहाराच्या मुद्दावरून जिल्हा परिषदेच्या सभेत चर्चा झाली. जानेवारी महिन्यात पाेषण आहारचे वितरण सुरु होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली ठग यांनी दिली. दीड वर्षापासून गोदामात पडलेले धान्य विद्यार्थ्यांना थेट न देता त्याची तपासणी करुनच वाटप करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार आहारच देण्यात यावा, अशी आग्रहाची मागणी यावेळी विरोधकांनी केली.

इतर मुद्द्यांवर वादळी चर्चा

  • निमकर्दा येथील बांधकाम असलेला शासकीय भूखंड २९ वर्षांसाठी रजिस्टर भाडेपट्याने देण्यात आल्याचा मुद्दा वंचितचे राम गव्हाणकर यांनी सभेत उपस्थित केला. यावर योग्य कार्यवाही न झाल्यास उपाेषण करू, असाही इशारा त्यांनी दिला. यावर सात दिवसात कार्यवाहीची ग्वाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बाेटे यांनी दिली.

  • गांधीग्राम येथील पूल बंद असून, गाेपालखेड येथून वाहतुकीवर मर्यादा आहेत. त्यामुळे अकाेट जवळपास ३०० गावे प्रभावित झाली असल्याने यावर ताेडगा निघत नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा प्रहार जनशक्ति पक्षाच्या सदस्य स्फूर्ती गावंडे यांनी सभेत निषेध केला.

  • कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आरंगबाद जिल्ह्यातील सिल्लाेड येथील कृषी महाेत्सवाच्या निमंत्रक पत्रिकांचे सदस्यांना सभेतच वितरण करण्यात आले. महाेत्सवासाठी १५ काेटीची वसुली करण्यात येत असल्याचा आराेप शिवसेनेच्या सदस्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com