esakal | अकोल्याला मिळाल्या पहिल्या अप्पर पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीणमधून मोनिका राऊत यांची बदली
sakal

बोलून बातमी शोधा

Akola gets first Upper Superintendent of Police, Transfer of Monica Raut from Nagpur Rural

जिल्ह्याच्या इतिसाहात प्रथमच अधीक्षक दर्जाच्या पदावर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये कार्यरत अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांची अकोला येथील रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोल्याला मिळाल्या पहिल्या अप्पर पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीणमधून मोनिका राऊत यांची बदली

sakal_logo
By
मनोज भिवगडे


अकोला,  ः जिल्ह्याच्या इतिसाहात प्रथमच अधीक्षक दर्जाच्या पदावर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये कार्यरत अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांची अकोला येथील रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


अकोला येथील अप्पर पोलिस अधीक्षकांचे पद गेले वर्षभरापासून रिक्त होते. विजकांत सागर यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागेवर विक्रांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी रूजू होताच अकोल्यातून बदली करून घेतली. त्यामुळे पुन्हा रिक्त झालेल्या जागेवर नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आला नाही.

या पदाचा प्रभार अकोला प्रशिक्षण केंद्राचे अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत वाघुर्डे यांच्याकडे होता. वर्षभरानंतर का होईना पण अकोल्यात मोनिका राऊत या अप्पर पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)